Kalicharan Maharaj:’हिंदुत्व तोडणारा राक्षस’,कालीचरण महाराजांची जरांगेंवर खोचक टीका

0

नगर : थडग्यावर चादर चढवणारा त्यांचा नेता हा हिंदुत्व तोडणारा राक्षस,असा घणाघात कालीचरण महाराज यांनी केला. कालीचरण महाराजांनी (Kalicharan Maharaj) नाव न घेता मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा उल्लेख राक्षस (Monster) असा केला आहे. लाखो मुंबईमध्ये गेले, ते खातील काय,टॉयलेटला जातील कुठे हे टेन्शन होतं का?असं कालीचरण महाराज म्हणाले आहेत.

नक्की वाचा : २९७ मतदान केंद्रांचे होणार वेब कास्टिंग; शहरात एकूण ३ लाख १३ हजार मतदार

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर पहिल्यांदाच कालीचरण महाराज यांनी अतिशय खोचक शब्दांत टीका केली आहे. कालीचरण महाराजांनी टीका करताना मनोज जरांगे पाटील यांचं प्रत्यक्ष नाव घेतलेलं नाही. पण त्यांचा पूर्ण रोख मनोज जरांगे यांच्याच दिशेला होता. त्यांनी मनोज जरांगे यांचा उल्लेख थेट राक्षस असा केला. त्यांच्या टीकेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

अवश्य वाचा : भक्तिमय वातावरणात आ. संग्राम जगताप यांच्या प्रचाराची सांगता

कालीचरण महाराज नेमकं काय म्हणाले ? (Kalicharan Maharaj)

“कुठला त्यांचा नेता थडग्यावर चादर चढवेल. आला रे चादरवाला आला रे आला. हे जाती-जातीच्या आरक्षणाच्या गोष्टी नाहीत तर हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेले राक्षस आहेत. राक्षस!”,असा घणाघात कालीचरण महाराजांनी केला. “आता एक आंदोलन सुरु झालं होतं ते तुम्हाला माहिती आहे का, हिंदू-हिंदूंमध्ये फूट पाडायचं.अशी हवा होती त्या आंदोलनाची.  लाखो लोकं मुंबईत. टेन्शन काय होतं माहिती आहे? एवढे लोकं जेवतील कुठे आणि टॉयलेटला जातील कुठे? मला टेन्शन आलं की, त्यांनी आता जावं कुठे?”, असं कालीचरण महाराज म्हणाले.

कालीचरण महाराजांची टीका कशावर?(Kalicharan Maharaj)

मनोज जरांगे पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी मोठं आंदोलन केलं होतं.लाखो मराठा आंदोलकांसह त्यांच्या जालना येथील अंतरवली सराटी गावाहून मुंबईच्या दिशेला आले होते. जरांगे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले होते. त्यासाठी ते नवी मुंबईत वाशीपर्यंत पोहोचले होते. जरांगेंची रॅली मुंबईत पोहोचली तर वाहतुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो याचा विचार करत राज्य सरकारने त्यांना तिथेच स्थानबद्ध करत मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांची भेट घेतली होती. त्यावेळी मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या आश्वासनाच्या आधारावर माघारी परतले होते. याच आंदोलनावर कालीचरण महाराजांनी टीका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here