Kalki 2898 AD Teaser : ‘कल्की’चा नवा टीझर प्रदर्शित, चित्रपटात ॲक्शन आणि AI चा जलवा 

'कल्की 2898 एडी'  या चित्रपटाच्या या टीझरमध्ये, 'बुज्जी' नावाच्या रोबोटची ओळख चाहत्यांना करून दिलेली आहे. हा रोबोट भैरवचा सोबती असल्याचे दाखवण्यात आले.

0
Kalki 2898 AD Teaser
Kalki 2898 AD Teaser

नगर : तेलगू दिग्दर्शक नाग अश्विन दिग्दर्शितकल्की 2898 एडी’ (Kalki 2898 AD) या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी या बिग बजेट चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली होती. मात्र आता निर्मात्यांकडून चित्रपटाचा एक नवा टीझर रिलीज करण्यात आलेला आहे. या टीझरमध्ये निर्मात्यांनी ‘बुज्जी’ (Bujji) नावाच्या पात्राची ओळख करुन दिलेली दिसत आहे.

नक्की वाचा : राजस्थान रॉयल्सने बंगळुरुला मात देत क्वालिफायरमध्ये केला प्रवेश

टीझरमध्ये ‘बुज्जी’ नावाच्या रोबोटची चाहत्यांना झाली ओळख (Kalki 2898 AD Teaser)

‘कल्की 2898 एडी’  या चित्रपटाच्या या टीझरमध्ये, ‘बुज्जी’ नावाच्या रोबोटची ओळख चाहत्यांना करून दिलेली आहे. हा रोबोट भैरवचा सोबती असून भैरवच्या म्हणण्याप्रमाणे काम करत असल्याचे दाखवण्यात आले. या टीझरमध्ये प्रेक्षकांना धमाकेदार ॲक्शन आणि AI ची किमया पाहायला मिळेल. अवघ्या काही सेकंदाच्या ह्या टीझरने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. चित्रपटाला संतोष नारायणन यांनी संगीत दिले आहे. या ट्रेलरमधील बुज्जी आणि भैरवची मैत्री नेटकऱ्यांना प्रचंड भावली असून चाहते सध्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत.

अवश्य वाचा : बचावासाठी आलेली ‘एसडीआरएफ’ची टीमच बुडाली

२७ जून २०२४ ला रिलीज होणार चित्रपट (Kalki 2898 AD Teaser)

‘कल्की 2898 एडी’  या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हासन आणि दिशा पटानी सह अनेक दिग्गज सेलिब्रिटी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.हा बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या २७ जून २०२४ ला रिलीज होणार आहे. या बिगबजेट चित्रपटाची निर्मिती ६०० कोटींच्या आसपास केलेली आहे. हा बिग बजेट चित्रपट मे २०२४ मध्ये रिलीज होणार होता. पण निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट बदलली आहे. मात्र आता हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये  प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here