Kalsubai : कळसूबाई शिखरावर २८ वर्षांपासून अखंडितपणे घटस्थापना

Kalsubai : कळसूबाई शिखरावर २८ वर्षांपासून अखंडितपणे घटस्थापना

0
Kalsubai : कळसूबाई शिखरावर २८ वर्षांपासून अखंडितपणे घटस्थापना
Kalsubai : कळसूबाई शिखरावर २८ वर्षांपासून अखंडितपणे घटस्थापना

Kalsubai : अकोले : घोटी शहरातील कळसूबाई (Kalsubai) मित्रमंडळाचे गिर्यारोहक सन १९९७ पासून म्हणजेच गेल्या २८ वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्वोच्च असलेल्या कळसूबाई शिखरावर (Kalsubai peak) नवरात्रीत घटस्थापना करून विजयादशमीपर्यंत (Vijayadashami) नऊ दिवस उपवास करून दररोज सर्वोच्च शिखर सर करून कळसूआईची मनोभावे पूजा करतात. यावर्षीही ही सेवा अखंडितपणे सुरू ठेवली आहे. कळसूबाई मित्रमंडळाचे सर्व गिर्यारोहक आपले व्यवसाय, कामधंदा सांभाळीत २८ वर्षांपासून अखंडितपणे हा अनोखा छंद जोपासत आहेत.

अवश्य वाचा: पुण्यात दोन चिमुरड्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार

जोपासना करणार्‍या गिर्यारोहकांची दखल

या आगळ्यावेगळ्या छंदाची जोपासना करणार्‍या गिर्यारोहकांची दखल घेत संगमनेरचे उद्योजक डॉ. संजय मालपाणी, मनीष मालपाणी, बाळासाहेब देशमाने, इगतपुरी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर लहाने यांनी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला गिर्यारोहकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शिखरावर घटस्थापना करण्यासाठी उद्योजकांनी घटकलशाचे पूजन करून गिर्यारोहकांना घटकलश सुपूर्द केला. मंडळाच्या गिर्यारोहकांनी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पहाटेच शिखर सर करून शिखरस्वामीनी कळसूआईचे पूजन व आरती करून शिखरावर घटस्थापना केली. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नक्की वाचा: दुर्गामाता दौडीत नारीलाच नाकारले,संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

या उपक्रमात सहभाग (Kalsubai)

या उपक्रमात कळसूबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, सोमनाथ भगत, नीलेश आंबेकर, नीलेश पवार, गणेश काळे, प्रवीण भटाटे, काळू भोर, सुधाकर तांबे, संजय जाधव, राजू माने, भगवान तोकडे, नाना टाकळकर, शरद महाले, नितीन भागवत, संकेत वाडेकर, चेतन जाधव, चेतन छत्रे, नामदेव जोशी, सोनू गिते, बाळू आरोटे, ज्ञानेश्‍वर मांडे, डॉ. कैलास गायकर, डॉ. महेंद्र आडोळे, अभियंता मयूर मराडे, सचिन लंगडे, विकास जाधव, योगेश शिरसाठ, संजय शेवाळे, गोकुळ सूर्यवंशी, अशोक हेमके, भानुदास जाधव, कैलास नवले, बाळू भोईर, श्रावण सोपे, रोशन लहाने, अवधूत दिवटे, देवीदास पाखरे, उमेश दिवाकर आदी सहभागी झाले होते.