Kalsubai Shikhar : कळसुबाई शिखरावर नववर्षाचे भक्तिमय स्वागत

Kalsubai Shikhar : कळसुबाई शिखरावर नववर्षाचे भक्तिमय स्वागत

0
Kalsubai Shikhar : कळसुबाई शिखरावर नववर्षाचे भक्तिमय स्वागत
Kalsubai Shikhar : कळसुबाई शिखरावर नववर्षाचे भक्तिमय स्वागत

Kalsubai Shikhar : अकोले : घोटी येथील कळसूबाई मित्रमंडळ गेल्या तीन दशकांपासून व्यसनमुक्तीचा (Addiction Recovery) संदेश देत निरोगी जीवनशैलीचा प्रसार करण्याची प्रेरणादायी परंपरा अखंडपणे जपत आहे. मराठी नूतन वर्ष (New Year 2026) असो वा इंग्रजी नववर्ष, प्रत्येक नवीन वर्षाचे स्वागत महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसूबाई शिखरावर (Kalsubai Shikhar) करण्याची ही आगळीवेगळी परंपरा मंडळाने गेली ३० वर्षे सातत्याने जोपासली आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेचा मुख्य निवडणूक निरीक्षक यांच्याकडून आढावा

नव्या वर्षाचे उत्साहात स्वागत

इंग्रजी नववर्ष २०२६ च्या प्रथमदिनी कळसूबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांनी ब्रह्ममुहूर्तावर पहाटेच शिखरावर चढाई करत सूर्योदयाच्या सोनेरी किरणांत शिखरस्वामिनी कळसूबाई मातेचा पंचामृत अभिषेक, पूजन व आरती केली. भक्तिभावाने सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

अवश्य वाचा: युवा सेना जिल्हाप्रमुख आकाश कातोरे व शहरप्रमुख महेश लोंढे यांची पक्षातून हकालपट्टी

पर्यावरण संरक्षणावर भर (Kalsubai Shikhar)

मंडळाच्यावतीने केवळ ट्रेकिंगपुरतेच नव्हे, तर सामाजिक भान जपत व्यसनमुक्ती, आरोग्य संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण यावर भर दिला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत कळसूबाई मातेची नियमित सेवा तसेच वर्षभर शिखर व जिल्ह्यातील विविध गड-किल्ल्यांवर स्वच्छता अभियान राबवून प्लास्टिकमुक्त परिसर ठेवण्याचा संकल्प मंडळाकडून सातत्याने राबवला जात आहे. हा संकल्प पुढील काळातही कायम ठेवण्याचा निर्धार गिर्यारोहकांनी व्यक्त केला.

या नववर्ष स्वागत सोहळ्यात कळसूबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, प्रवीण भटाटे, नीलेश पवार, सुरेश चव्हाण, अशोक हेमके, बाळासाहेब आरोटे, भगीरथ म्हसणे, भगवान तोकडे, सोमनाथ भगत, सुधाकर तांबे, नामदेव जोशी, संजय शेवाळे, गोकुळ सूर्यवंशी, नाना टाकळकर, ज्ञानेश्वर काळे, सागर पलटणे, नितीन भागवत, संदीप खाडे, तानाजी खाडे, गजानन चव्हाण, राजू मराडे, हरीश आतकरी, गुरुनाथ आडोळे, देवीदास पाखरे यांच्यासह राज्यातील विविध भागांतून आलेले अनेक पर्यटक सहभागी झाले होते.