Kamini Kaushal Passes Away: बॉलिवूडचा जुना चेहरा हरपला! अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन

0
Kamini Kaushal Passes Away:बॉलिवूडचा जुना चेहरा हरपला! अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन
Kamini Kaushal Passes Away:बॉलिवूडचा जुना चेहरा हरपला! अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन

नगर: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री (Senior Actress)कामिनी कौशल (Kamini Kaushal) यांचं निधन (Passes Away) झाले आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वयोमानानुसार झालेल्या आजारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे. १९४० ते १९६० च्या दशकात त्या इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या. कामिनी कौशल यांच्या कुटुंबातील व्यक्तीने सांगितल्यानुसार,’कामिनी कौशल यांच्या कुटुंबाला सध्या प्रायव्हसी हवी आहे.

नक्की वाचा: ‘महाराज तुम्ही फेटा खाली उतरवायचा नाही’;इंदुरीकर महाराजांसाठी रुपाली ठोंबरे पाटील मैदानात 

बॉलिवूडमधील सगळ्यात सर्वात वयस्कर अभिनेत्री कामिनी (Kamini Kaushal Passes Away)

कामिनी यांनी अनेक बॉलिवूड सिनेमामध्ये आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. बॉलिवूडमधील सगळ्यात सर्वात वयस्कर अभिनेत्री कामिनी होत्या. २४ फेब्रुवारी १९२६ला जन्मलेल्या कामिनीने त्या काळी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. १९४६ मध्ये त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. ब्लॅक अॅण्ड व्हाईट सिनेमातून त्यांची कारकीर्द सुरु झाली. त्यांनी अनेक सिनेमातून आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांनी दिलीप कुमार तसंच राज कपुर यासारख्या मोठ्या कलाकरांसोबत अनेक चित्रपट केले आहेत.

अवश्य वाचा: अभिमानास्पद! माढ्याचे चार सुपुत्र एकाचवेळी झाले उपजिल्हाधिकारी  

कामिनी कौशल यांची कारकीर्द ? (Kamini Kaushal Passes Away)

कामिनी कौशलने तिच्या अभिनयाच्या करिअरमध्ये नदिया के पार, शबनम, आरजू आणि बिराज बहू, जेलर, नाइट क्लब, शहीद यासारख्या सिनेमामध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली. कामिनी यांचा ‘नीचा नगर’ हा सिनेमा सुपरहिट ठरला. तसंच तिच्या सिनेमाला पहिल्यादा कान्स फेस्टिवलमध्ये बेस्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.