नगर : बॉलिवूड (Bollywood) विश्वात लगीनघाई सुरु असतानाच आता पुन्हा एकदा एक अभिनेत्री लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. कंगना रणौत(Kangana Ranaut) हिने तिच्या लग्नाची तयारी सुरु केल्याचं समोर आलं आहे.
नक्की वाचा : ६ डिसेंबरला ‘महापरिनिर्वाण’ होणार प्रदर्शित
कंगनाने तिच्या लग्नाचा पेहराव देखील निवडल्याचं सांगितलं जात आहे. त्याचप्रमाणे तिने आपल्या लग्नाचा ड्रेस हा डिझायनरकडून तयार करुन घेणार असल्याची माहितीसमोर आली आहे. दरम्यान तीचा हा ड्रेसचा डिझायनर इंडस्ट्रीमधील एक असल्याचं सांगण्यात येत आहे. पण सध्या तरी कंगनाने तिच्या लग्नाबाबतच्या गोष्टी या खासगी ठेवण्याचा निर्णय घेतलाय. असं असलं तरीही कंगनाने तिचा बॉयफ्रेंड आहे हे मात्र कबूल केलं होतं.
अवश्य वाचा : कबड्डीत महाराष्ट्राची दिल्लीवर मात
कंगना कोणासोबत करणार लग्न ? (Kangana Ranaut Marriage)
कंगना रणौत लग्न करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. याच दरम्यान कंगनाने राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला देखील हजेरी लावली होती. त्यावेळी कंगना आणि निशांत पिट्टीचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यावर कंगनाने स्पष्टीकरण देत निशांत विवाहित असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. त्यानंतर कंगना एका परदेशी व्यक्तीसोबत हात हात धरुन चालताना देखील दिसली होती. त्यामुळे कंगना आता कोणासोबत लग्नगाठ बांधणार याची उत्सुकता सध्या तिच्या चाहत्यांना लागून राहिली आहे.
कंगना रणौतचे सिनेमे (Kangana Ranaut Marriage)
कंगना ही नुकतीच इमर्जन्सी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्याचप्रमाणे चंद्रमुखी 2′ या सिनेमातही ती झळकणार आहे. कंगनाचा ‘धाकड’ हा सिनेमा 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर स्टारर ‘टीकू वेड्स शेरू’ या सिनेमाचीदेखील कंगनाने निर्मिती केली आहे.