Kanhaiya Kumar : नगर : काँग्रेसचे उत्तर-पूर्व दिल्ली (Delhi) लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांच्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीतील आपच्या पक्ष कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर जमावाला सामोर जाताना एक व्यक्तीने त्यांच्या कानशिलात लगावली. तसेच, मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यावर शाईफेकही करण्यात आली. या घटनेमध्ये आम आदमी पक्षाच्या (Aam Adami Party) स्थानिक नगरसेविका छाया गौरव शर्मा यांच्याशीही जमावाने गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हे देखील वाचा: मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊतांवर गुन्हा दाखल
हार घालण्याच्या बहाण्याने हल्ला (Kanhaiya Kumar)
कन्हैया कुमार यांना काँग्रेसनं उत्तर-पूर्व दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. यासंदर्भात कन्हैया कुमार स्थानिक आप नगरसेविका छाया शर्मा यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आले होते. भेट झाल्यानंतर कन्हैया कुमार कार्यालयातून बाहेर पडत असताना समोर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी जमली होती. या गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने त्यांना हार घालण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर हल्ला केला. आधी हार घालून नंतर कन्हैया कुमार यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर ही व्यक्ती कन्हैया कुमार यांना मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.
नक्की वाचा: सैन्य दलातील नायक सानप यांना अखेरचा निरोप
कन्हैया कुमारला अद्दल घडवल्याचे वक्तव्य (Kanhaiya Kumar)
दोन व्यक्तींनी घेतली जबाबदारी
दरम्यान, या हल्ल्यानंतर दोन व्यक्तींचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपणच कन्हैया कुमार यांना मारल्याचं या व्यक्ती कबूल करताना दिसत आहेत. तसेच, त्यानंतर झालेल्या मारहाणीत आपणही जखमी झाल्याचा दावा या व्यक्ती करताना दिसत आहेत. कन्हैया कुमार यांना कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीचं नाव दक्ष असल्याचं सांगितलं जात आहे. “भारत तेरे टुकडे होंगे असं कुणाला म्हणू देणार नाही. कन्हैया कुमारला चांगलीच अद्दल घडवली आहे. या सगळ्यात माझंही डोकं फुटलंय”, असं ही व्यक्ती व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे.