Karate Competition : नगर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) चषक इंडियन खुल्या रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे (Karate Competition) आयोजन येत्या १८ व १९ जानेवारी वाडिया पार्क क्रीडा संकुलात (Wadia Park Sports Complex) होणार आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत १५ राज्यांतील ८३० खेळाडू सहभागी होणार आहेत. खेळाडूंनी आपले कौशल्य सादर करणार आहेत, असे अहिल्यानगर शहर शिवसेना (Shiv Sena) शहरप्रमुख सचिन जाधव यांनी दिली.
नक्की वाचा : ‘संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना घरात लपवणाऱ्यांचाही हिशोब होणार’-बजरंग सोनवणे
विजेत्यांसाठी रोख बक्षीसे आणि ट्रॉफी देण्यात येणार
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, युवा सेना शहर प्रमुख महेश लोंढे आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन अहिल्यानगर शहर शिवसेना, युथ कराटे फेडरेशन व स्पोर्ट्स ओके यांच्यातर्फे करण्यात आले आहे. आयोजक साहिल सय्यद व सबिल सय्यद म्हणाले, या स्पर्धेचा उद्देश खेळाडूंना प्रोत्साहन देणे आहे. विजेत्यांसाठी रोख बक्षीसे आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे. मागील वर्षी स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकाविले होते. कर्नाटक आणि गुजरात यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान मिळवले होते. या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ उपस्थित राहणार आहेत. अहिल्यानगर रुरल ॲण्ड अर्बन कराटे असोसिएशन यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
अवश्य वाचा : आधी नियमित पाणी पुरवठा करा, नंतर दरवाढ करावी : अभय आगरकर
यावेळी सचिन जाधव म्हणाले, (Karate Competition )
स्व. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण नगर शिवसेनेच्या वतीने केले जाते आहे. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना खेळासाठी व्यासपीठ उभे करण्याचा मानस शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासाठी अहिल्यानगर शिवसेनेच्या वतीने माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी १५ राज्यातून सुमारे ८३० खेळाडू सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.