Kargil Vijay Diwas : वृक्षारोपण करीत कर्जतमध्ये कारगिल विजय दिवस साजरा

Kargil Vijay Diwas : वृक्षारोपण करीत कर्जतमध्ये कारगिल विजय दिवस साजरा

0
Kargil Vijay Diwas : वृक्षारोपण करीत कर्जतमध्ये कारगिल विजय दिवस साजरा
Kargil Vijay Diwas : वृक्षारोपण करीत कर्जतमध्ये कारगिल विजय दिवस साजरा

Kargil Vijay Diwas : कर्जत : २६ व्या कारगिल विजय दिनाच्या (Kargil Vijay Diwas) निमित्ताने २६ झाडांचे वृक्षारोपण (Tree Plantation) करून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. भविष्यात शहीद स्मृती उद्यान साकारण्याचा संकल्प करण्यात आला. शनिवारी आजी-माजी सैनिक संघटना, सर्व सामाजिक संघटना व कर्जत नगरपंचायतीच्या (Karjat Nagar Panchayat) संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

नक्की वाचा : पाथर्डीत जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाचा छापा; ११ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

हुतात्मा स्मारकास अभिवादन

२६ जुलै रोजी भारतात सर्वत्र कारगिल विजय दिन साजरा करण्यात येतो. यावेळी शहरातील हुतात्मा स्मारकास अभिवादन करीत श्रमदानातून स्वामी समर्थ मंदिर परिसरात २६ वृक्षांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, नगरसेवक प्रसाद ढोकरीकर, देविदास खरात तसेच माजी सैनिक सुनील साळुंके, श्रीकांत मारकड, जालिंदर जमदाडे, सुधीर करपे, रामदास फरांडे, अरुण माने, राजू तोरडमल, राम सुपेकर, संपत बिटके, काकासाहेब कुतवळ, नानासाहेब गाढवे, गणपत तांदळे यांच्यासह सर्व सामाजिक संघटनांचे पर्यावरणप्रेमी शिलेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवश्य वाचा : अमेरिकन टेक कंपन्यांना ट्रम्प यांचा स्पष्ट इशारा; आता भारत आणि चीनसारख्या देशांमधून होणार नाही भरती

शहरालगत शहीद स्मृती उद्यान उभारण्याचा संकल्प (Kargil Vijay Diwas)

प्रास्ताविक करताना आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब रानमाळ यांनी कारगिलयुद्धातील आठवणींना उजाळा दिला. तसेच कारगिल युद्धातील शहिदांना आदरांजली अर्पण केली. भविष्यात आजी-माजी सैनिक संघटना, सर्व सामाजिक संघटना व कर्जत नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शहरालगत शहीद स्मृती उद्यान उभारण्याचा संकल्प त्यांनी आपल्या मनोगतामध्ये मांडला. यावर कर्जतच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले यांनी कर्जत नगरपंचायतच सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून शहीद स्मृती उद्यानासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन अशी ग्वाही दिली. यावेळी सर्व आजी-माजी सैनिकांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विशाल मेहेत्रे यांनी केले तर आभार श्रीकांत मारकड यांनी मानले.