Karjat : कर्जत येथील उपनगराच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

Karjat : कर्जत येथील उपनगराच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

0
Karjat : कर्जत येथील उपनगराच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य
Karjat : कर्जत येथील उपनगराच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

Karjat : कर्जत : येथे रविवारच्या रिमझिम पावसाने (Rain) उपनगरातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था पहावयास मिळत असून रस्ते चिखलमय झाले आहे. चिखलाच्या साम्राज्याने कर्जत (Karjat) उपनगरातील रहिवाशी त्रस्त झाले आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने त्याचा अंदाज येत नसल्याने वाहन चालकांना लहान-मोठ्या अपघातास (Accident) सामोरे जावे लागते. चांगला रस्ता नसेल तरी चालेल, किमान नीट चालता येईल असा मुरूम रस्ता झाला तरी दिलासा मिळेल, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

Karjat : कर्जत येथील उपनगराच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य
Karjat : कर्जत येथील उपनगराच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

नक्की वाचा: महाराष्ट्राला स्वाभिमानाची परंपरा – संजय राऊत

रस्त्यांवर होणाऱ्या चिखलाने जीव मुठीत धरून प्रवास

तब्बल १५ दिवसाच्या प्रतिक्षेनंतर रविवारी कर्जत शहरात मान्सून पावसाच्या मध्यम सरी बरसल्या. त्यांनतर रात्रभर रिमझिम पावसाने उपनगरातील अनेक रस्ते चिखलांच्या दलदलीने माखले गेले. कर्जत शहराच्या काही उपनगरात मुंबई-पुणे अशा महानगरांना लाजवेल, असे अंतर्गत रस्ते पहावयास मिळते. तर दुसरीकडे चिखलांचे रस्त्याने ग्रामीण भागात आहोत का? असा सवाल कर्जतच्या उपनगरवासीयांना पडतो. शारदानगरीचा काही भाग, बालाजीनगर, शिक्षक कॉलनी लगतचा परिसर, गदादेनगर, स्वामीसमर्थ नगर, बेलेकर कॉलनी आणि गदादेनगरला जोडणारा भाग पावसाळ्यात अक्षरशा रग्बीचे मैदानासारखा असतो. भुरभुर पावसाने तर चालणे देखील मुश्किल ठरते.

अवश्य वाचा: जिओ,एअरटेलला धक्का; टाटा आणि बीएसएनएलमध्ये मोठा करार

ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शाळकरी मुलांना त्रास (Karjat)

याचा जास्त त्रास ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शाळकरी मुलांना पहावयास मिळतो. तर वाहन चालकांना वाहने घसरण्याची भीती राहते. किंवा चालवताना कसरत करावी लागते. यात पाण्याचे डबके साचले असता त्यांचा अंदाज न आल्याने लहान किरकोळ अपघात देखील घडतात. वरील सर्व भागात उच्च सुशिक्षित लोकांची मानववस्ती असून आलिशान बंगले आहेत. कर्जत नगरपंचायत बांधकाम परवाना, यासह जागेची खरेदी नोंद करताना विविध विकासाच्या नावाखाली रक्कम घेत असताना भौतिक सुविधा देताना मागे सरकत असल्याची प्रतिक्रिया उपनगरातील नागरिक देतात. सिमेंट किंवा पेव्हर ब्लॉक रस्ता नसला तरी चालेल पण किमान रस्त्यावर नीट चालत घरी येता येईल असा मुरूमचा रस्ता दिला तरी पुरेसा होईल, अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here