Karjat : रिमझिम पावसाने कर्जत बसस्थानकात चिखलच चिखल

Karjat : रिमझिम पावसाने कर्जत बसस्थानकात चिखलच चिखल

0
Karjat : रिमझिम पावसाने कर्जत बसस्थानकात चिखलच चिखल
Karjat : रिमझिम पावसाने कर्जत बसस्थानकात चिखलच चिखल

Karjat : कर्जत : कर्जत (Karjat) येथील बसस्थानकात साधा पाऊस पडला तरी चिखलाचे साम्राज्य पसरते. या चिखलामुळे परिसर निसरडा बनून सर्वसामान्य प्रवाशी, दुचाकी-चालक घसरून लहान-मोठे अपघात (Accident) देखील घडल्याचे उदाहरणे असताना बसस्थानक (Bus Stand) परिसरात डांबरीकरण, सिमेंट काँक्रीटकरण किंवा पेव्हर ब्लॉक बसविले का जात नाही? अशा प्रश्न प्रवाशांसह सर्वसामान्य कर्जतकरांना पडला आहे. वास्तविक पाहता तालुक्याचे ठिकाण असणारे बसस्थानकाची ही दयनीय परिस्थिती आहे. दररोज हजारो प्रवासी या स्थानकातून ये-जा करीत आहेत.

Karjat : रिमझिम पावसाने कर्जत बसस्थानकात चिखलच चिखल
Karjat : रिमझिम पावसाने कर्जत बसस्थानकात चिखलच चिखल

नक्की वाचा: ‘मोदींना सत्ता आणायला छत्रपती लागतात,पण अरबी समुद्रात स्मारक होत नाही’- मनोज जरांगे

भीज पावसाने सर्वत्र चिखल

कर्जतचे बसस्थानक सध्या पावसामुळे स्थानक न राहता रग्बी खेळाचे मैदान बनले आहे. भीज पावसाने सर्वत्र चिखलच चिखल दिसत आहे. त्यात काही ठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने अंगावर घाण पाणी उडत आहे. जुने बसस्थानक असताना परिसरात किमान डांबरीकरण तरी नावाला होते. मात्र, नवीन सात फलाटाचे बसस्थानक केल्यापासून परिसरात वेळोवेळी मुरूम टाकून तात्पुरती डागडुजी करीत तसेच वापरण्याचा सपाटा महामंडळाकडून होत आहे. पावसाळ्यात तर बसस्थानक परिसरात चिखलाच्या साम्राज्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना चालणे देखील मुश्किलीचे ठरते.

अवश्य वाचा: अरेच्चा! शेतकऱ्याने शेळ्यांसाठी शिवला रेनकोट

समस्या सोडविण्याची मागणी (Karjat)

आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात अनेक शासकीय विभागाचे कार्यालय तसेच परिसराचे रुपडे बदलले आहे. मात्र, यास कर्जत बसस्थानकच का अपवाद राहत आहे? असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांसह कर्जतकरांना देखील पडला आहे. बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस एसटी आगाराचे काम अंतिम टप्प्यात असून त्याठिकाणी मुरूम टाकून रोलरने दाबण्यात आला आहे. मात्र, बसस्थानक परिसरात अनेक वर्षांपासून डांबरीकरण, सिमेंटचे काँक्रीटीकरण अथवा पेव्हर ब्लॉक न टाकता तसेच वापरले जात आहे. किमान येण्या-जाण्यासाठी तरी सुलभ होऊ शकते, असा मार्ग काढावा अशी मागणी पुढे येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here