Karjat : कर्जत : परीटवाडी (ता.कर्जत) (Karjat) येथील ग्रामस्थांकडून गावाची भौगोलिक परिस्थितीची माहिती घेत त्याच गावाचा नकाशा (Village Map) हुबेहूब रेखाटत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय (Punyashlok Ahilyadevi Holkar College of Agriculture) हाळगाव येथील कृषीकन्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता (Agricultural Awareness) आणि औदयोगिक कार्यानुभव प्रकल्पातर्गत कृषी विस्तार शिक्षण ग्रामीण सहभागी मुल्यांकन उपक्रम सादर करीत वाहवा मिळवली.
नक्की वाचा : भैरवनाथ देवस्थानच्या अन्नछत्रासाठी फिरोदिया कुटुंबियांकडून मोठी मदत
सामाजिक-आर्थिक संस्था, शेतजमीन आदींची प्रत्यक्ष पाहणी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हाळगाव येथील कृषीकन्यांनी कर्जत तालुक्यातील परीटवाडी येथे ग्रामीण कृषी जागरूकता आणि औदयोगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी विस्तार शिक्षणाचा सहभागी ग्रामीण मुल्यांकन उपक्रमसाठी कृषिकन्या श्रावणी दसगुडे, सुवर्णा आवळे, वंदना बहिर, पुजा बांगर, अंजली चौधरी, पुजा चेके गावात दाखल झाल्या. या कृषीकन्यांनी परीटवाडीच्या ग्रामस्थांसोबत गावात भटकंती फेरी मारत गावातील नैसर्गिक संसाधने, सामाजिक – आर्थिक संस्था, शेतजमीन आदी बाबींची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली.
अवश्य वाचा : शिवाजी कर्डिलेंना ‘२०२४ बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर’ पुरस्कार
रांगोळी, दगड, माती, रंगीत कागदाच्या साह्याने गावाचा नकाशा (Karjat)
सहभागी ग्रामीण मूल्यांकन (पीआरए) उपक्रमांतर्गत रांगोळी, दगड, माती, रंगीत कागदाच्या साह्याने परीटवाडी गावाचा नकाशा, लोकसंख्या वर्गीकरण, शेतजमिनीतील पिकांचे वर्गीकरण यासह सिंचन, चपाती आकृती यांचा वृत्तालेख अवघ्या काही वेळातच परिसरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात काढून दाखवला. यात प्रामुख्याने ग्रामपंचायात कार्यालय, प्राथमिक शाळा, दूध संकलन केंद्रे, मंदिरे, सौरऊर्जा प्रकल्प, पोल्ट्री, रस्ते व शेतीचे क्षेत्र इत्यादींचा उल्लेख केला होता. या कार्यक्रमास सरपंच विलास काळे, ग्रामपंचायत सदस्य बापूराव काळे, प्रगतशील शेतकरी महादेव जाधव, नाना गवळी, गोरख जगताप, महादेव जगताप, नामदेव क्षीरसागर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रकल्पासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ अनिल काळे, कार्यक्रम सम्वयक डॉ. सखेचंद अनारसे, केंद्र प्रमुख डॉ. प्रेरणा भोसले, अधिष्ठाता प्रतिनिधी प्रा. अरुण पाळंदे, कार्यक्रम अधिकारी डॉ.निकिता धाडगे, कृषी विस्तार विषय विशेष तज्ञ डॉ. प्रणाली ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.