Karjat : कर्जतमध्ये सत्ताधारी नगरसेवकांचे आंदोलन

Karjat : कर्जतमध्ये सत्ताधारी नगरसेवकांचे आंदोलन

0
Karjat : कर्जतमध्ये सत्ताधारी नगरसेवकांचे आंदोलन
Karjat : कर्जतमध्ये सत्ताधारी नगरसेवकांचे आंदोलन

Karjat : कर्जत : ग्रामपंचायत अस्तित्वात असल्यापासून सफाई कामगार (Cleaning workers) म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. कर्जत (Karjat) शहर आणि उपनगराचा पाणी पुरवठा (Water supply) तत्काळ सुरळीत करावा, या मागणीसाठी सत्ताधारी नगरसेवकांनी धरणे आंदोलन करीत प्रशासनास धारेवर धरले. यावेळी मुख्याधिकारी (Chief Officer) अक्षय जायभाये यांनी लेखी आश्वासन दिल्याने नगरसेवक भास्कर भैलुमे, पाणी पुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल आणि रवी सुपेकर यांनी आंदोलन स्थगित केले.

नक्की वाचा : लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली नवी माहिती

लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

लिलाबाई भाऊ कांबळे, कमल शिवाजी भिसे, विमल सुधाकर आखाडे, भामाबाई लक्ष्मण भैलुमे, पार्वती ईश्वर कदम, सुशिला मारूती ओव्हळ आणि विमल मुरलीधर लोढे या महिला स्वच्छता कामगार ग्रामपंचायत अस्तित्वात असताना सफाई कामगार म्हणून तुटपुंज्या मानधनावर सेवा देत होते. या कामगारांच्या वारसांना सेवेत सामावून घेणे. वास्तविक पाहता तो त्यांचा अधिकार असून प्रशासन वेळोवेळी त्याकडे दुर्लक्ष करून अन्याय करीत आहे. सत्ताधारी नगरसेवक असलो तरी आम्ही कर्जतचे सुजाण नागरिक आहोत, या नात्याने आजचे आंदोलन छेडले असल्याचे नगरसेवक भैलुमे, तोरडमल आणि सुपेकर यांनी सांगितले. याबाबत मुख्याधिकारी अक्षय जायभाये यांनी कक्ष अधिकारी अजिनाथ गीते, सचिन घुले आणि सुनील शेलार यांच्यासह आंदोलनकर्त्याची भेट घेत लवकरच याबाबत अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक घेत जे काही शक्य होईल, त्या नियमास अनुसरून योग्य निर्णय घेतला जाईल. जेणेकरून कोणत्याही सफाई कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, असे लेखी आश्वासन देत उपोषण स्थगित करण्यात यश मिळवले.

अवश्य वाचा : “मराठी गया तेल लगाने”, असे म्हणणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांनी चांगलीच घडवली अद्दल

कर्जत शहर आणि उपनगरात वारंवार विस्कळीत (Karjat)

यासह पाणी पुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल यांनी कर्जत शहर आणि उपनगरात वारंवार विस्कळीत पाणीपुरवठा बाबत मुख्याधिकारी यांना धारेवर धरले. खेड येथील वीज पुरवठा अनियमित होत असून नुकतेच कोळवडी येथे पाणीपुरवठा करणारी नळ योजना फुटली, ती दुरुस्त करण्यात आली आहे. त्यामुळे दोन-तीन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल. जलशुद्धीकरण केंद्रावर तुरटी, टीसीएल पावडरचा पुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक संतोष मेहेत्रे, सुनील शेलार, सतिष पाटील, रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम, आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष आखाडे, विजय साळवे, किशोर कांबळे, सुमित भैलुमे यांच्यासह कर्जत नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.