Karjat : प्रत्येक गावासाठी जलकृती आराखड्याची गरज : बिराजदार

Karjat : प्रत्येक गावासाठी जलकृती आराखड्याची गरज : बिराजदार

0
Karjat : प्रत्येक गावासाठी जलकृती आराखड्याची गरज : बिराजदार
Karjat : प्रत्येक गावासाठी जलकृती आराखड्याची गरज : बिराजदार

Karjat : कर्जत : पाणी सजीव सृष्टीसाठी नितांत आवश्यक आहे. यासाठी पाण्याचे महत्व सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. कर्जत (Karjat) तालुक्यात उन्हाळ्यात पाणीटंचाई (Water shortage) जाणवत असते. शेतीसाठी पाणी उपलब्ध असताना विविध भागात त्याचे असमान वितरण आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थानी (Local Government) देखील पाण्याचे महत्व जाणले पाहिजे. त्यानुसार त्याचे नियोजन करावे. उपलब्धतेवर भर द्यावा, असे प्रतिपादन तहसीलदार गुरू बिराजदार (Guru Birajdar) यांनी केले. कोळवडी (ता.कर्जत) येथे जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सर्व विभाग प्रमुख, राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. कर्जत-जामखेड तालुक्यातील घोड, भीमा व सिना या नद्यांचे जल असलेल्या कलशाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असून उपस्थितांना जलप्रतिज्ञा देण्यात आली.

नक्की वाचा : मोठी बातमी! संभाजी भिडेंवर भटक्या कुत्र्याचा हल्ला

जल व्यवस्थापन घरोघरी पोहोचविण्यासाठी हा उपक्रम

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर म्हणाले की, पाण्याचे स्रोत मर्यादित असून दिवसांदिवस पाण्याची मागणी वाढत आहे. ही तफावत दूर करून पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, पाणी उपलब्धतेनुसार पीक रचना निवडणे आणि सुक्ष्म सिंचनाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने जल व्यवस्थापन कृती आराखडा घरोघरी पोहोचविण्यासाठी हा उपक्रम रबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर पोहोचत पाण्याशी निगडित नागरिकांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करावा. पाणी व्यवस्थापनाचे नवे तंत्र, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, जनजागृती करावे, असे आवाहन केले.

अवश्य वाचा : पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार, महिला पीएसआयकडून आरोपीचा एन्काऊंटर!

जनजागृती करण्यासाठी जलव्यवस्थापन पंधरवड्याचे आयोजन (Karjat)

याप्रसंगी अंबादास पिसाळ, अशोक जायभाय, गणेश बेरड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कुकडीचे अभियंता उत्तम धायगुडे म्हणाले की, पाण्याची उपलब्धता, नियोजन, पाण्याची बचत याबाबत जनजागृती करण्यासाठी जलव्यवस्थापन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात तसेच कर्जत –जामखेड तालुक्यात येत्या १५ दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. लाभधारक शेतकरी व अधिकारी यांची कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे संवाद चर्चा सत्र आयोजन, वाल्मी संस्था, छत्रपती संभाजीनगर येथील तज्ञ मंडळी या ठिकाणी पाणी वापर संस्था स्थापन करणे व त्यांचा लाभ यासाठी मार्गदर्शन करणार आहे. या पंधरवडयात भुसंपादन सद्य स्थिती, अडचणी व उपाय योजना यावर श्रीगोंदा येथे १९ एप्रिल रोजी एकदिवशीय शिबिराचे अयोजन करण्यात आले आहे. ‘जलसंपदा आपल्या गावी’ या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या गावातच दूर करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी गटविकास अधिकारी रुपचंद जगताप, विजय शेवाळे, राजेंद्र गुंड, शांतीलाल कोपनर, अशोक खेडकर,सुनील यादव, काकासाहेब धांडे, विजय मोढळे,अशोक जगताप यांच्यासह सर्व प्रशासकीय प्रमुख, लाभार्थी शेतकरी पदाधिकारी उपस्थित होते.