Karjat : कर्जत : कर्जत सर्व सामाजिक संघटना व प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक ग्रामीण सेवाभावी प्रतिष्ठान कर्जत (Karjat) यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकार ११ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल “एक पेड माँ के नाम” वृक्षारोपण पार पडले. यावेळी भाजपचे (BJP) जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांच्या संकल्पनेतून कर्जत शहरात वृक्ष लागवड (Tree Plantation) करण्यात आली.
नक्की वाचा : गृहकर्ज,वाहन कर्ज स्वस्त होणार;रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटवला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण
यावेळी नगराध्यक्षा रोहिणी घुले, उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे, मंडळ अध्यक्ष अनिल गदादे, विनोद दळवी, सुनील यादव, सुनील शेलार, रवींद्र सुपेकर, प्रशांत शिंदे यांच्यासह सर्व सामाजिक संघटनेचे श्रमप्रेमी उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला ११ वर्षे पूर्ण झाली असून मोदी सरकारचा ११ वर्षातील यशस्वी प्रवास व विकासाभिमुख कार्य अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी ‘संकल्प ते सिद्धीपर्यंत’ या सूत्रानुसार “एक पेड माँ के नाम’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अवश्य वाचा : क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचे काम सरकार करत आहे : चंद्रशेखर बावनकुळे
दीड लाख वृक्षारोपण (Karjat)
मागील १ हजार ७०८ दिवसांपासून जवळपास दीड लाख वृक्षारोपण करून त्याचे यशस्वी जतन करणारे स्वच्छ, सुंदर आणि हरित कर्जतसाठी झटणारे सर्व सामाजिक संघटना आणि प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक ग्रामीण सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत बुवासाहेब नगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.