Karjat Band : कर्जत: राशीन (ता.कर्जत) येथील क्रांतिसूर्य महात्मा फुले चौकात भगवा स्वराज्य ध्वज लावण्याचे काम शांततेत चालू असताना केवळ पोलीस निरीक्षक (Police Inspector) कर्जत यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे जातीय तेढ निर्माण सदृश्य परिस्थिती उदभवली. घटनेत कोणतीही खातरजमा आणि शहानिशा न करता मराठा समाजाच्या जमावावर लाठीचार्ज करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल (Crime Filed) केल्याचा आरोप करत सकल मराठा समाजाच्या (Maratha Community) वतीने कर्जत बंदची (Karjat Band) हाक देण्यात आली होती. यावेळी पोलीसांनी दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे, या आशयाचे निवेदन पोलीस उपअधीक्षक आणि तहसीलदार कर्जत यांना देण्यात आले.
नक्की वाचा : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर फेकली अंडी;भारतीयांचा संताप
खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप
रविवारी (ता.१३) मध्यरात्री राशीन येथील क्रांतिसूर्य महात्मा फुले चौकात अठरा पगड जातीचा प्रतीक असणाऱ्या भगव्या स्वराज्य ध्वजाची उभारणी शांततेत चालू होती. चौक नामांतर करण्याचा कसलाही प्रकार नाही आणि यापुढे देखील नसणार अशी भूमिका मराठा समाजाची होती. केवळ कर्जत पोलीस दलाच्या चुकीच्या आणि आठमुठेपणाच्या भूमिकेमुळे दोन्ही समूहात जातीय तेढ निर्माण होईल, अशी परिस्थिती उदभवली गेली. विशेष म्हणजे पोलिसांनी कोणतीही खातरजमा आणि शहानिशा न करता विनाकारण सकल मराठा समाजाच्या जमावावर लाठीचार्ज केला. तसेच मराठा तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले, असा आरोप करत सकल मराठा समाजाच्यावतीने मंगळवारी कर्जत बंदची हाक देण्यात आली होती.
अवश्य वाचा : अभिमानास्पद! छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश
व्यापाऱ्यांनी व्यवहार दिवसभर ठेवले कडकडीत बंद (Karjat Band)
यावेळी सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार दिवसभर कडकडीत बंद ठेवले होते. सकाळी ११ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी काही काळ ठिय्या दिला. यावेळी अनेकांनी कालच्या पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर आपल्या भाषणात ताशेरे ओढत आक्षेप नोंदविला. आणि शेवटी आंदोलनकर्त्यांनी पोलीस उपअधीक्षक गणेश उगले आणि तहसीलदार गुरू बिराजदार यांना मराठा समाजाच्या तरुणावरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावे, याबाबत निवेदन दिले. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.