Karjat Bus Stand : कर्जत बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य

Karjat Bus Stand : कर्जत बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य

0
Karjat Bus Stand : कर्जत बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य
Karjat Bus Stand : कर्जत बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य

Karjat Bus Stand : कर्जत : कर्जत बसस्थानकात (Karjat Bus Stand) साधा पाऊस पडला तरी चिखलाचे (Mud) साम्राज्य पसरते. या चिखलामुळे परिसर निसरडा बनून सर्वसामान्य प्रवासी, दुचाकीचालक घसरून लहान-मोठे अपघात देखील घडल्याची उदाहरणे असताना बसस्थानक परिसरात डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रीटकरण (Cement Concreting) का केले जात नाही? अशा प्रश्न कर्जतकरांना पडला आहे.

नक्की वाचा: पाथर्डी शहरात फ्रॉड कॉल्सचा कहर; मोबाईलवर आले शेकडो ओटीपी

चिखलामुळे प्रवाशांना चालणे देखील मुश्किल

कर्जतचे बसस्थानक सध्या पावसामुळे रग्बी खेळाचे मैदान बनले आहे. बुधवार आणि गुरुवारच्या भीज पावसाने सर्वत्र चिखलच चिखल दिसत आहे. जुने बसस्थानक असताना परिसरात किमान डांबरीकरण तरी नावाला होते. मात्र, नवीन सात फलाटाचे बसस्थानक केल्यापासून परिसरात वेळोवेळी मुरूम टाकून तात्पुरती डागडुजी करीत तसेच वापरण्याचा सपाटा महामंडळाकडून होत आहे. पावसाळ्यात तर बसस्थानक परिसरात चिखलाच्या साम्राज्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना चालणे देखील मुश्किलीचे ठरते. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार या दोन्ही कार्यक्षम लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यकाळात महत्वाचे रस्ते, शहरातील अंतर्गत रस्ते, अनेक शासकीय विभागाचे कार्यालय तसेच परिसराचे रुपडे बदलले आहे.

आवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने व सर्व मांस विक्री केंद्र दोन दिवस बंद

चिखलाकडे देखील एसटी प्रशासनाचे वेधले लक्ष (Karjat Bus Stand)

आमदार पवार यांनी विविध कार्यालयात देखणे बगीचे त्यात सुंदर अशी झाडे लावत परिसराचे सुशोभीकरण करीत प्रसन्न वातावरण निर्माण केले. मात्र, यास कर्जत बसस्थानकच का अपवाद ठरते? अशा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांसह कर्जतकरांना देखील पडला आहे. बाहेरच्या प्रवाशांना शहरात प्रवेश करणारे ठिकाणच विकासापासून वंचित दिसत असल्याने त्याचे रुपडे बदलणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया एका सामाजिक कार्यकर्त्याने दिली आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि मित्रपक्षांनी देखील एकदिवसीय लाक्षणिक आंदोलनात कर्जतच्या बसस्थानक परिसरात पावसाने होणाऱ्या चिखलाकडे देखील एसटी प्रशासनाचे लक्ष वेधले होते.