Workshop : कर्जत : ज्वारी (Sorghum) हे महाराष्ट्रातील जनतेचे प्रमुख अन्न पीक आहे. त्याचा दैनंदिन आयुष्यात वापर कमी झाल्याने मानवाला बद्धकोष्ठता, लठ्ठपणा(Obesity), मधुमेह यांसारख्या रोगांना चालना मिळाली आहे. यामुळे ज्वारी पिकास दैनंदिन आहारात अनन्य साधारण महत्व आहे. आहारात दोन वेळा समावेश केल्यास ते मानवी आरोग्याला हितकारक ठरते, असे प्रतिपादन डॉ. यु. बी दळवी यांनी केले. ते कर्जत (Karjat) तालुक्यातील ज्वारी पिकाच्या कार्यशाळेत (Sorghum crop workshop) बोलत होते.
नक्की वाचा : मराठा आरक्षणाच्या आड येणारांना गुलाल लागू देणार नाही : मनोज जरांगे
कर्जत तालुक्यातील तालुका कृषी कार्यालयाकडून सर्व कृषी अधिकारी- कर्मचाऱ्याची ज्वारी व रब्बी हंगामातील पिकावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ.यु.बी दळवी आणि डॉ.व्ही.बी शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
अवश्य वाचा : प्रवासात सुट्ट्या पैशांची चिंता मिटली; प्रवाशांच्या सेवेत डिजिटल तिकीट
डॉ शिंदे म्हणाले की, सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ज्वारी पिकांच्या अधिक उत्पादनासाठी अचूक वाण निवडणे आवश्यक आहे. यासाठी वेळोवेळी तज्ञ अभ्यासक, उत्तम उत्पादकता घेणारे शेतकरी यांचे मार्गदर्शन घ्यावे. त्यांच्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या प्रतवारीप्रमाणे ज्वारी वाणाची निवड करावी. मंडळ कृषी अधिकारी अनिल भापकर यांनी किड व रोग व्यवस्थापन तर अमर अडसूळ यांनी तुषार सिंचन आणि हरभरा लागवडीवर उपस्थितांशी संवाद साधला. तसेच कृषी सहाय्यक सतिश सरोदे यांनी तुर्कीच्या बाजरी लागवडीवरील यशोगाथेचे अनुभव कथन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापुसाहेब होले यांनी तर आभार प्रदर्शन संजय घालमे यांनी मानले.