Karjat Police : कर्जतला पोलीस विभागाकडून दंगा काबू नियंत्रण प्रात्यक्षिक

Karjat Police : कर्जतला पोलीस विभागाकडून दंगा काबू नियंत्रण प्रात्यक्षिक

0
Karjat Police : कर्जतला पोलीस विभागाकडून दंगा काबू नियंत्रण प्रात्यक्षिक
Karjat Police : कर्जतला पोलीस विभागाकडून दंगा काबू नियंत्रण प्रात्यक्षिक

Karjat Police कर्जत : अरे पळा, पोलीस (Police) आक्रमक झाले आहेत. कोणालाच सुट्टी मिळणार नाही, असे म्हणत अचानक जमाव पळताना दिसत होता. त्या पाठोपाठ पोलीस अधिकारी-कर्मचारी डोक्यात हेल्मेट, हातात लाठ्या, काठ्या, तर कोणाच्या हातात बंदुकी घेत त्यांच्यावर नियंत्रण मिळवत होते. आगामी काळात होणाऱ्या सण-उत्सवच्या (Festivals) पार्श्वभूमीवर कर्जत पोलीस (Karjat Police) प्रशासन कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सज्ज असून कोणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यास कोणतीही गय केली जाणार नाही, याचे दंगा काबू नियंत्रण प्रात्यक्षिक पार पडले.

नक्की वाचा : भंडारदराला जाण्यासाठीच्या वाहतुकीत बदल

सण उत्सवाच्या पार्श्वभूमीची

शनिवारी सकाळी ११ वाजता दादा पाटील महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात कर्जत पोलिसांनी नूतन पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दंगा काबू नियंत्रण प्रात्यक्षिक पार पाडले. आगामी काळात गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद तसेच नवरात्र उत्सव असून या काळात कर्जत शहर आणि तालुक्याची कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच सदरचे सण उत्सव आनंदाने व शांततेत पार पडावे, यासाठी कर्जत पोलिसांनी दंगा काबू नियंत्रण प्रात्यक्षिक घेतले.

अवश्य वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती

विविध विभागाचे कर्मचारी सहभागी (Karjat Police)

अचानक पोलिसांचा लवाजमा सायरन वाजवत मैदानात येतो. त्या पाठोपाठ अग्निशमन विभाग, रुग्णवाहिका दाखल होते. पलीकडे घोषणाबाजी करीत एक समूह पोलिसांच्या अंगावर चाल करून दगडफेक करीत असतानाचे दृश्य पाहून लोकांची भंबेरी उडते. त्या संतप्त जमावावर अग्निशमनच्या वाहनातून पाण्याचा भडीमार करीत पोलीस लाठीमार करून आटोक्यात आणताना दिसत होते. पाहता-पाहता लोकांची गर्दी वाढते कर्जतमध्ये दंगल उसळली काय? असा प्रश्न येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरूना पडतो. मात्र शेवटी हे दंगा काबू नियंत्रण असल्याचे समजताच लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या प्रात्यक्षिकात पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट, सहायक पोलिस निरीक्षक रमीज मुलाणी, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोऱ्हाडे, महसूल विभागाचे परशुराम होगले यासह कर्जत आरोग विभाग, नगरपंचायत अग्निशमन विभाग तसेच पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.