Chandu Champion: कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’ मधील फर्स्ट लूक प्रदर्शित

'चंदू चॅम्पियन'चा फर्स्ट लूक हा अपेक्षेपेक्षाही दमदार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या पोस्टरमध्ये कार्तिक आर्यन हा लंगोटवर असून जीव तोडून धावताना दिसत आहे.

0
Chandu Champion
Chandu Champion

नगर : बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik Aryan) वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या कार्तिकच्या बहुप्रतीक्षित ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. अशातच कार्तिकच्या या आगामी चित्रपटाचा पहिले पोस्टर (First Poster) प्रदर्शित झाला आहे. या पोस्टर मधील कार्तिक आर्यनच्या जबरदस्त लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

नक्की वाचा : मतदान जनजागृतीसाठी कलर्स मराठीच्या लोगोमध्ये बदल

‘चंदू चॅम्पियन’चा फर्स्ट लूक आला समोर (Chandu Champion)

कार्तिक आर्यनने ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचा पहिले पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. “चॅम्पियन येत आहे. माझ्या करिअरमधील सर्वात आव्हानात्मक आणि खास चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करताना खूप उत्साही व अभिमान वाटत आहे,” असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे. या चित्रपटासाठी कार्तिकने खूप मेहनत घेतल्याचं पोस्टरमधून पाहायला मिळत आहे. ‘चंदू चॅम्पियन’ मधील कार्तिकचा लंगोटमधील हा पहिला लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कार्तिकला या नव्या अवतारात पाहून कलाकारांसह नेटकऱ्यांनी त्याच्या पोस्टवर चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अवश्य वाचा : ज्या दिवशी मी हिंदू-मुस्लिम करेन, त्या दिवशी सार्वजनिक जीवनात राहण्यास पात्र नसेल’- मोदी

‘चंदू चॅम्पियन’चा फर्स्ट लूक हा अपेक्षेपेक्षाही दमदार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या पोस्टरमध्ये कार्तिक आर्यन हा लंगोटवर असून जीव तोडून धावताना दिसत आहे. फर्स्ट लूकमध्ये कार्तिक आर्यन खूप आत्मविश्वासाने दिसत आहे आणि पोस्टरमध्ये आर्यनची मेहनत आणि शारीरिक बदल स्पष्टपणे दिसत आहेत. ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटात कार्तिक एक वेगळी भूमिका निभावत आहे. ती हुबेहूब साकारण्यासाठी त्याने कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. या चित्रपटात कार्तिकला अस्खलित मराठी बोलता यावे म्हणून त्याने १४ महिने कठोर मेहनत घेतली आहे.

कोणावर आधारीत आहे चित्रपट?(Chandu Champion)

कबीर खान यांच्याबरोबर साजिद नाडियाडवालाने या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळलीय. चंदू चॅम्पियन’मध्ये कार्तिकबरोबर अभिनेत्री विद्या बालन, तृप्ती डिमरी झळकणार आहे. या चित्रपटाची कथा मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. सुवर्णपदक विजेते पेटकर यांनी १९७० साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये आणि त्यानंतर १९७२ साली जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशाचं नाव उज्वल केलं होतं. त्यांचाच प्रवास या चित्रपटात दाखवणार आहे. हा चित्रपट १४ जूनला प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here