नगर : आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकून घेणारी गायिका कार्तिकी गायकवाडचा (Kartiki Gaikwad) मोठा चाहता वर्ग आहे. आता लग्नाच्या चार वर्षानंतर कार्तिकीने आणखी एक गुड न्यूज दिली आहे. कार्तिकी आई होणार असून नुकताच तिच्या डोहाळे जेवणाचा (Dohale Meal) कार्यक्रम पार पडला. याचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नक्की वाचा : राजस्थानने सलग दुसऱ्यांना मैदान गाजवलं;दिल्लीवर १२ धावांनी मात
‘सा रे ग म प’ लिटल चॅम्प्स’ च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या कार्तिकी गायकवाडचा मोठा चाहता वर्ग आहे. कार्तिकीने आपल्या सुरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. ‘सा रे ग म प’ लिटल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वाची कार्तिकी गायकवाड विजेती ठरली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
कार्तिकीच्या घरी हलणार पाळणा (Kartiki Gaikwad)
कार्तिकी आई होणार असल्याचे समोर आल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. गायिका असलेली कार्तिकी गायकवाडने रोनित पिसे याच्यासोबत २०२० मध्ये लग्नगाठ बांधली होती. या दोघांचं अॅरेंज मॅरेज आहे. या विवाह सोहळ्याची चर्चा झाली होती. त्यानंतर आता लग्नाच्या चार वर्षानंतर कार्तिकी आई होणार आहे.कार्तिकीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
अवश्य वाचा : उन्हाचा चटका पुन्हा वाढणार; उकाड्याने नागरिक हैराण
कार्तिकीच्या डोहाळे जेवणात तिचा खास अंदाज (Kartiki Gaikwad)
कार्तिकीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार पडला. या डोहाळे जेवणासाठी कार्तिकीनं हिरवी कलरची साडी नेसली होती. चेहऱ्यावर दिसून येत असलेल्या ग्लोमुळे कार्तिकीचे सौंदर्य आणखीच खुलून आले होते. कार्तिकीच्या डोहाळ जेवणात ती आणि तिचा नवरा रोहित ट्रेडिशनल लूकमध्ये दिसले. कार्तिकीने या खास कार्यक्रमासाठी हिरव्या रंगाची जरीची सुंदर साडी नेसली होती तर रोहित शेरवानीमध्ये दिसला. कार्तिकीने या खास सोहळ्यासाठी खास पारंपरिक दागिने घातले होते.