Kashinath Date : निघोज व लोणी मावळा परिसरातील शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज 

Kashinath Date : निघोज व लोणी मावळा परिसरातील शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज 

0
Kashinath Date : निघोज व लोणी मावळा परिसरातील शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज 
Kashinath Date : निघोज व लोणी मावळा परिसरातील शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज  पारनेर: तालुक्यातील विविध भागांतील शेतकरी जंगली श्वापदांच्या धास्तीमुळे वा तत्सम कारणांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून दिवसा वीजपुरवठा मिळावा, यासाठी सातत्याने मागणी करत होते. शेतीच्या सिंचनासाठी वीजचे लोडशेडींगमुळे पीकांना पाणी देणे, पिण्यासाठी वा इतर वापरासाठी पाणी भरणे, विजेवर आधारित नित्याच्या गरजा भागविण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री चालविणे यासारखी महत्त्वाची कामे करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र, आता निघोज व लोणी मावळा येथील सोलार ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होणार असून निघोज व लोणी मावळा परिसरातील शेतकऱ्यांना उद्यापासून दिवसा वीज उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी दिली. या उपक्रमासाठी संबंधित कंपनीकडून सौर प्रकल्पाद्वारे विजेची निर्मिती करून तो वीजपुरवठा शेतकऱ्यांना उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निघोज येथील 7 मेगावॅट क्षमतेच्या सोलार प्रकल्पाचे काम आवादा नामक कंपनीने पूर्ण केले असून सबंधित प्रकल्पाची टेस्टिंग होऊन उद्यापासून लगेचच निघोज, जवळा, गुणोरे आणि वडनेर या 4 फिडर वर शेतीपंपासाठी सप्लाय देता येणार आहे, तर लोणी मावळा उपकेंद्रात 5 मेगावॅट क्षमतेचा सोलार प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून उद्यापासून शेतकऱ्यांना रोज सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत दिवसा वीजपुरवठा देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे लोणी मावळा, रांधे, दरोडी, गारखिंडी या गावासह निघोज फीडर वरील लामखडे वस्ती, डेरे मळा, ढवणवाडी, शिवडी, मुक्कामळा, गुणोरे फिडरवर काळे वस्ती, लंके वस्ती, लाळगे मळा, टेकडी फाटा, मगरदरा, तुकाईवाडी, जवळा फिडरवर पठारवाडी, बोदगेवाडी, तुकाई मळा, लाळगे मळा, कवाद कॅंप मळा तर वडनेर फिडरवर भुकनमाळा, चौधरी मळा, मोरवाडी, वाजेवाडी, बाबा मळा, बोचरे मळा, टेंभी मळा, येवले मळा शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार असुन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रकल्पाला खुप मदत केली असल्याचेही आमदार दाते यांनी सांगितले. राळेगणसिद्धी नंतर तालुक्यात प्रथमच या गावांतील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे, यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह आणि समाधानाचे वातावरण आहे. अनेक वर्षांच्या संघर्षाचे फळ अखेर मिळाल्याने ग्रामीण भागातील कृषी विकासाला चालना मिळेल, या निर्णयामुळे भविष्यात शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक सुकर होईल, पिकांच्या गुणवत्तेत सुधारणा होईल आणि आत्मविश्वास अधिक दृढ होईल, यानिमित्ताने स्थानिक शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण, उप अभियंता गहांडुळे, पवार यांचेही आभार व्यक्त केले आहेत.

Kashinath Date : पारनेर : तालुक्यातील विविध भागांतील शेतकरी जंगली श्वापदांच्या धास्तीमुळे वा तत्सम कारणांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून दिवसा वीजपुरवठा मिळावा, यासाठी सातत्याने मागणी करत होते. शेतीच्या सिंचनासाठी वीजचे लोडशेडींगमुळे पीकांना पाणी देणे, पिण्यासाठी वा इतर वापरासाठी पाणी भरणे, विजेवर आधारित नित्याच्या गरजा भागविण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री चालविणे यासारखी महत्त्वाची कामे करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र, आता निघोज व लोणी मावळा येथील सोलार ऊर्जा प्रकल्पाच्या (Solar Energy Project) माध्यमातून ही गरज पूर्ण होणार असून निघोज व लोणी मावळा परिसरातील शेतकऱ्यांना उद्यापासून दिवसा वीज उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती पारनेर-नगर विधानसभा (Parner-Nagar Vidhan Sabha) मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते (Kashinath Date) यांनी दिली.

नक्की वाचा : प्रा. राम शिंदे यांच्याविरुध्द अवमानकारक वक्तव्य करणारे सूर्यकांत मोरे यांना हक्कभंगाची नोटीस

पालकमंत्री विखे यांची प्रकल्पाला मदत

या उपक्रमासाठी संबंधित कंपनीकडून सौर प्रकल्पाद्वारे विजेची निर्मिती करून तो वीजपुरवठा शेतकऱ्यांना उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निघोज येथील 7 मेगावॅट क्षमतेच्या सोलार प्रकल्पाचे काम आवादा नामक कंपनीने पूर्ण केले असून सबंधित प्रकल्पाची टेस्टिंग होऊन उद्यापासून लगेचच निघोज, जवळा, गुणोरे आणि वडनेर या 4 फिडर वर शेतीपंपासाठी सप्लाय देता येणार आहे, तर लोणी मावळा उपकेंद्रात 5 मेगावॅट क्षमतेचा सोलार प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून उद्यापासून शेतकऱ्यांना रोज सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत दिवसा वीजपुरवठा देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे लोणी मावळा, रांधे, दरोडी, गारखिंडी या गावासह निघोज फीडर वरील लामखडे वस्ती, डेरे मळा, ढवणवाडी, शिवडी, मुक्कामळा, गुणोरे फिडरवर काळे वस्ती, लंके वस्ती, लाळगे मळा, टेकडी फाटा, मगरदरा, तुकाईवाडी, जवळा फिडरवर पठारवाडी, बोदगेवाडी, तुकाई मळा, लाळगे मळा, कवाद कॅंप मळा तर वडनेर फिडरवर भुकनमाळा, चौधरी मळा, मोरवाडी, वाजेवाडी, बाबा मळा, बोचरे मळा, टेंभी मळा, येवले मळा शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार असुन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रकल्पाला खुप मदत केली असल्याचेही आमदार दाते यांनी सांगितले.

अवश्य वाचा: श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थानच्या नवनियुक्त विश्वस्त मंडळाने पदभार स्वीकारला

ग्रामीण भागातील कृषी विकासाला चालना (Kashinath Date)

राळेगणसिद्धी नंतर तालुक्यात प्रथमच या गावांतील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे, यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह आणि समाधानाचे वातावरण आहे. अनेक वर्षांच्या संघर्षाचे फळ अखेर मिळाल्याने ग्रामीण भागातील कृषी विकासाला चालना मिळेल, या निर्णयामुळे भविष्यात शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक सुकर होईल, पिकांच्या गुणवत्तेत सुधारणा होईल आणि आत्मविश्वास अधिक दृढ होईल, यानिमित्ताने स्थानिक शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण, उप अभियंता गहांडुळे, पवार यांचेही आभार व्यक्त केले आहेत.