Kashinath Date : “आदिवासी बांधवांना अंत्यविधीसाठी जागा का नाही?”; सभागृहात काशिनाथ दाते यांचा आक्रमक प्रश्न

Kashinath Date : “आदिवासी बांधवांना अंत्यविधीसाठी जागा का नाही?”; सभागृहात काशिनाथ दाते यांचा आक्रमक प्रश्न

0

Kashinath Date : पारनेर : पारनेर-नगर विधानसभा (Parner-Nagar Vidhan Sabha) मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते (Kashinath Date) यांनी सुरू असलेल्या अधिवेशनात (Convention) राज्यातील बहुतांश आदिवासी बांधवांना अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध नसल्याचा गंभीर मुद्दा सभागृहात उपस्थित केला. कर्जत तालुक्यातील पाटेवाडी येथे एका आदिवासी महिलेच्या निधनानंतर अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध नसल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीकडे लक्ष वेधत त्यांनी शासनाला जाब विचारला.

नक्की वाचा : नारायणडोह येथील दरोड्यातील दोन आरोपी जेरबंद

आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न निर्माण

आ. दाते सभागृहात बोलताना (ता. २२) सप्टेंबर २०२४ कर्जत तालुक्यातील पाटेवाडी येथे एका आदिवासी महिलेचे निधन झाले होते. मात्र स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने अंत्यविधी उशिरा पार पडला. या घटनेमुळे आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न निर्माण झाला. अशा घटना राज्यात इतरत्र घडत आहेत का, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

अवश्य वाचा : झिम्बाब्वेविरुद्ध ‘करो या मरो’ लढत”; सुपर-८मध्ये भारताची कसोटी

सामाजिक न्यायाचा मुद्दा अधोरेखित (Kashinath Date)

या प्रश्नाद्वारे आमदार काशिनाथ दाते यांनी आदिवासी समाजाच्या सन्मानाचा व मूलभूत अधिकारांचा मुद्दा प्रभावीपणे मांडला.“अंत्यसंस्कारासाठीही जागा न मिळणे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे; शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत,” अशी ठाम भूमिका त्यांनी सभागृहात मांडत सामाजिक न्यायाचा मुद्दा अधोरेखित केला. मतदारसंघातील तसेच राज्यातील वंचित घटकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून आमदार दाते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here