Kashinath Date : शेती, पशुपालन आणि पक्षी संगोपनाचा अनोखा मेळा : काशिनाथ दाते

Kashinath Date : शेती, पशुपालन आणि पक्षी संगोपनाचा अनोखा मेळा : काशिनाथ दाते

0
Kashinath Date : शेती, पशुपालन आणि पक्षी संगोपनाचा अनोखा मेळा : काशिनाथ दाते
Kashinath Date : शेती, पशुपालन आणि पक्षी संगोपनाचा अनोखा मेळा : काशिनाथ दाते

Kashinath Date : पारनेर : जिल्हा परिषद अहिल्यानगर (Zilla Parishad Ahilyanagar)पशुसंवर्धन विभाग (Animal Husbandry Department), पंचायत समिती पारनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन २०२६ हे आमदार काशिनाथ दाते (Kashinath Date) यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात झालेे. विविध प्रकारच्या पशुधनाचे आकर्षक प्रदर्शन, गुणवंत पशुपालकांचा सन्मान आणि बक्षीस वितरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

नक्की वाचा : अहिल्यानगरचा संकल्प थोरात यंग ऑलिम्पिकचा ॲम्बेसेडर; करणार भारताचे प्रतिनिधित्व

दाते यांनी केले पशुपालकांच्या कष्टाचे कौतुक

यावेळी बोलताना आमदार दाते यांनी पशुपालकांच्या कष्टांचे कौतुक करत सांगितले की, “तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेली जनावरे येथे आणली आहेत. ही केवळ जनावरे नसून त्यांच्या कष्टाचे, जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी जनावरांचे संगोपन करत आहे, हे कौतुकास्पद आहे.” “मांजर, शेळी, कोंबडीपासून ते गाय, म्हैस, बैल आणि घोड्यांपर्यंत विविध पशुधन या प्रदर्शनात पाहायला मिळाले. काही पशुपालकांकडे आठ-दहा गायींचे गोठे आहेत, तर काहींनी उत्कृष्ट जातीचे बैल व जनावरे जोपासले आहेत. पिंपळनेर येथील दिंडीच्या रथाची बैलजोडी तसेच इतर उत्कृष्ट पशुधन पाहून आनंद झाला. या प्रदर्शनामुळे पशुपालन क्षेत्राला नवी दिशा मिळेल.”

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पशुधन टिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे कार्य आदर्श (Kashinath Date)

प्रदर्शनाच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितले की, “अशा प्रकारचे उपक्रम शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे ठरतात. कमी जलस्रोतांमध्येही चाऱ्याचे नियोजन करून पशुधन टिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे कार्य आदर्श आहे. शासनाच्या विविध योजनांमधून पशुपालकांना सातत्याने मदत मिळत असून या क्षेत्राला बळकटी देण्याचे काम सुरू आहे.” पशुप्रेमाबाबत बोलताना आमदार दाते म्हणाले की, “जनावरांचे संगोपन करताना आर्थिक भार व कष्ट मोठे असतात, मात्र छंद आणि प्रेमामुळे शेतकरी त्यांना मुलांप्रमाणे जपतो. हाच खरा पशुप्रेमाचा अर्थ आहे.” शेवटी त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक करत सर्व सहभागी पशुपालकांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रदर्शनामुळे तालुक्यातील पशुपालकांना प्रोत्साहन मिळून पशुपालन क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.