Kashmir : काश्मीरमध्ये 6 दहशतवादी ठार

Kashmir : काश्मीरमध्ये 6 दहशतवादी ठार

0
Kashmir : काश्मीरमध्ये 6 दहशतवादी ठार
Kashmir : काश्मीरमध्ये 6 दहशतवादी ठार

Kashmir : अहिल्यानगर : पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवून दहशतवाद्यांच्या तळांचा खात्मा केला. यानंतरही काही दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये (Kashmir) घुसखोरी केली होती. यापैकी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती भारतीय सैन्याने (Indian Army) पत्रकार परिषदेतून दिली. यातील एक ऑपरेशन शोपियानमधील केलर परिसरात आणि दुसरं ऑपरेशन पुलवामाच्या त्रालमध्ये पार पाडण्यात आलं.

Kashmir : काश्मीरमध्ये 6 दहशतवादी ठार
Kashmir : काश्मीरमध्ये 6 दहशतवादी ठार

नक्की वाचा : पुणे विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील फ्राईड राईसमध्ये रबराचे तुकडे!

मेजर जनरल धनंजय जोशी म्हणाले,

“22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर आम्ही काही परिसरांवर लक्ष केंद्रीत करत होतो. इंटेलिजन्सकडून आम्हाला माहिती मिळत होती. दहशतवाद्यांचे ग्रुप्स हे बर्फ वितळल्यानंतर जंगलात लपले आहेत, असं समजलं होतं. त्यानुसार उंच पर्वतांवरील जंगलांमध्ये आम्ही सैन्य तैनात केलं होतं. 12 तारखेला रात्री शोपियानमधील केलर परिसरात एक दहशतवादी ग्रुप असू शकतं, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. तिथे आधीपासूनच जे सैनिक तैनात होते ते लक्ष ठेवून होते. त्यानंतर 13 मे रोजी सकाळी जेव्हा त्यांना काही संशयास्पद हालचाली आढळल्या, तेव्हा त्यांनी कारवाई केली. त्याठिकाणी दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत 3 दहशतवादी मारले गेले. ज्या ठिकाणी हे ऑपरेशन केलर पार पडलं, ती जागा खूप उंचावर, दुर्गम होती.”

Kashmir : काश्मीरमध्ये 6 दहशतवादी ठार
Kashmir : काश्मीरमध्ये 6 दहशतवादी ठार

अवश्य वाचा : श्रीरामपुरातून १३ कोटींचे अंमली पदार्थ हस्तगत

दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर (Kashmir)

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, असं आश्वासन यावेळी मेजर जनरल धनंजय जोशी यांनी दिलं. शिवाय सर्व सुरक्षादलांचा ताळमेळ असल्यानेच ही कारवाई यशस्वी ठरल्याचं त्यांनी सांगितलं “दुसरं ऑपरेशन त्राल भागातील सीमावर्ती गावात करण्यात आलं. तिथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. आम्ही त्या गावाला वेढा घालत असतानाच दहशतवाद्यांनी नागरी वस्तीतील घरांमध्ये लपण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आमच्यावर गोळीबार केला. त्यावेळी ग्रामस्थांना, लहान मुलांना, महिलांना, वृद्धांना वाचवण्याचं आमच्यासमोर मोठं आव्हान होतं. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवल्यानंतर आम्ही तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला,” अशी माहिती त्यांनी दिली.