Kaun Banega Crorepati : कोण बनेगा करोडपती मधून बोलतो अशी बतावणी करून लुटणारा जेरबंद

Kaun Banega Crorepati

0
Kaun Banega Crorepati : कोण बनेगा करोडपती मधून बोलतो अशी बतावणी करून लुटणारा जेरबंद
Kaun Banega Crorepati : कोण बनेगा करोडपती मधून बोलतो अशी बतावणी करून लुटणारा जेरबंद

Kaun Banega Crorepati : नगर : कोण बनेगा करोडपतीमधुन (Kaun Banega Crorepati) बोलतोय, तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागली आहे, असे सांगुन ठकविणारा आरोपीस कल्याण येथून सायबर पोलिसांनी (Cyber ​​Police) ताब्यात घेतला आहे. त्याला न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस (Police) कोठडी सुनावली आहे. फैसल इकबाल मेमन (रा. मेमन मंजिल वाली पिर रोड, कल्याण ठाणे, निअर मुंबई), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत नारायण अरुने (रा. सर्जेपुरा, अहिल्यानगर) यांनी सायबर पोलीस ठाण्यात ता. १ ऑगस्ट २०२२ रोजी फिर्याद दिली होती.

नक्की वाचा : एचएमपीव्ही व्हायरसपासून वाचण्यासाठी काय करावं आणि काय करू नये ?

प्रोसेसिंग फिच्या नावाखाली पैसे पाठविण्यास सांगितले

व्हॉटसॲप कॉलवरुन कॉल करुन फिर्यादीचा विश्वास संपादन करुन, कोण बनेगा करोडपतीमधुन बोलतोय तुम्हाला २५ लाखाची लॉटरी लागली आहे, असे सांगितले. तसेच वेगवेगळे प्रोसेसिंग फिच्या नावाखाली फोन पे अकांऊट ऑनलाईन पैसे पाठविण्यास सांगितले. फिर्यादीने १ लाख ३३ हजार २०० रुपये टाकले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. 

अवश्य वाचा : कुकडी-घोड प्रकल्पातून चार आवर्तन सोडण्याचा निर्णय : मंत्री विखे

आरोपीस कल्याण येथून घेतले ताब्यात (Kaun Banega Crorepati)

त्याअनुषंगाने सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांना मिळालेल्या माहितीनुसार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधार हा गुन्हा फैसल मेमन याने केला असल्याचे तपासात उघड झाले. त्यानुसार आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करून आरोपीस कल्याण येथून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  ही कारवाई पोसई योगेश चाहेर, पोलीस अंमलदार अभिजीत अरकल, मल्लिकाअर्जुन बनकर, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, अरुण सांगळे, महिला अंमलदार सविता खताळ, दिपाली घोडके यांच्या पथकाने केली. 

नागरिकांनी कोण बनेगा करोड पती यामधुन आपणास २५ लाख रुपयेची लॉटरी लागली आहे, क्रेडिट कार्ड ॲक्टीव्हेशन करुन देतो, ऑनलाईन केवायसी अपडेट करुन देतो, पेट्रोल पंप एजन्सी देतो, ट्रेडिग ॲप डाऊनलोड करुन जास्त प्रमाणामध्ये परतावा देतो, असे वेगवेगळया आमिषाला बळी पडु नये, तसेच अनोळखी व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करतांना काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी केले आहे.