Kedarnath : केदारनाथला अडकलेल्या भाविकांशी आमदार काळेंनी साधला संवाद

Kedarnath : केदारनाथला अडकलेल्या भाविकांशी आमदार काळेंनी साधला संवाद

0
Kedarnath

Kedarnath : कोपरगाव : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) खराब हवामानामुळे काही भाविकांचा मूत्यू झाला असून असंख्य भाविक अडकले आहेत. त्यामुळे आपल्या मतदारसंघातून केदारनाथ (Kedarnath) यात्रेला गेलेले व केदारनाथमध्ये अडकलेल्या भाविकांशी संवाद साधून तुम्ही सुखरूप आहात ना? या काळजीपोटी आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी भ्रमणध्वनी वरून या भाविकांशी संपर्क करून त्यांच्याशी संवाद साधला.

अवश्य वाचा : महसूल व पशुसंवर्धन पंधरवडा शासनाची प्रतिमा उंचावणारा ठरेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केदारनाथमध्ये ढगफुटी झाल्याने परिस्थिती बिघडली

उत्तराखंड मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होवून या पावसाच्या तडाख्यात भूस्खलन होऊन अनेक पूल आणि रस्ते देखील वाहून गेले आहेत. बुधवारी (दि.३१) रोजी रात्री उशिरा उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये ढगफुटी झाल्याने परिस्थिती अजूनच बिघडली आहे. केदारनाथ परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे मंदाकिनी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अचानक झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात भाविक तेथे अडकले आहेत. त्यामुळे अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या आपल्या मतदार संघातील भाविक सुखरूप असतील का?अशी चिंता आमदार काळे यांना पडली होती.

नक्की वाचा: मनोज जरांगेंना मोठा दिलासा! न्यायालयाकडून अटक वॉरंट रद्द

सर्वजण सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले (Kedarnath)

त्यांनी अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या भाविकांचे मोबाईल नंबर मिळवत आपल्या व्यस्त कार्यक्रमातून मतदारसंघाचा कुटुंब प्रमुख या नात्याने त्यांनी या सर्व भाविकांशी संवाद साधला. तेव्हा भाविकांनी केदारनाथ येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण  झालेल्या भयानक परिस्थितीची माहिती सांगितली. स्थानिक प्रशासन आम्हा सर्व भाविकांना सर्वोतोपरी सहकार्य करत असून आम्ही सर्वजण सुखरूप असून गुप्तकाशी जवळ नारायणकोट येथे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपण आमची आस्थेवाईकपणे चौकशी केल्यामुळे आम्हाला निश्चितपणे पुढील प्रवासासाठी बळ मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी भाविकांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास संपर्क करा, कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू नका, आहे तेथे सुरक्षित रहा, आणि सुखरूप माघारी परत या, अशा काळजीवजा सूचना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here