Kerala Wayanad Landslide : वायनाडमध्ये भूस्खलन २७० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू; नगरकरांनो आपत्तीग्रस्तांना द्या मदतीचा हात

Kerala Wayanad Landslide : वायनाडमध्ये भूस्खलन २७० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू; नगरकरांनो आपत्तीग्रस्तांना द्या मदतीचा हात

0

Kerala Wayanad Landslide : नगर : केरळमधील वायनाडमध्ये निसर्ग कोपला (Kerala Wayanad Landslide) आहे. वायनाड भूस्खलनात (Wayanad Landslide) मृत्यूमुखी (Death) पडलेल्यांची संख्या २७० पेक्षा जास्त झाली असून ३०० अजूनही बेपत्ता आहेत. बचाव पथकांतर्फे जवळपास २००० लोकांची सुटका करण्यात आली आहे.

आपत्तीग्रस्तांसाठी वायनाड जिल्ह्यात ८२ मदत शिबिरे

वायनाडमधील आपत्तीग्रस्तांसाठी वायनाड जिल्ह्यात ८२ मदत शिबिरे उघडण्यात आली आहेत. जिथे १० हजारांहून अधिक लोकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. टीम युवान (सेवाव्रती) आणि ‘आय लव्ह नगर’ने २०१८ मध्ये केरळमधील पूरग्रस्तांप्रमाणे भूस्खलनात बळी पडलेल्या आणि बचावलेल्या कुटूंबियांना मदतीसाठी सज्ज आहे.

नगर संकलन केंद्रावर तातडीने मदत पाठवू शकता (Kerala Wayanad Landslide)

तुम्ही आमच्या नगर संकलन केंद्रावर खालील तातडीने मदत पाठवू शकता. हे साहित्य तुम्ही नगर शहरातील शांतीकुमारजी फिरोदिया फाउंडेशन महावीर विद्या प्रसारक मंडळाच्या सहयोगाद्वारे आणि तारकपूर परिसरातील कोठला रस्त्यावरील आयकर भवन मागील युवान संचलित छात्र निवास येथे पोहोचवू शकता. आपत्कालीन मदत सामग्री, वाहतूक, इतर रसद आणि अन्न खरेदी करण्यासाठी तुम्ही या संकेतस्थळावर प्रत्यक्ष ऑनलाईन मदत करू शकता – https://www.yuvaan.org/contribution.php

Kerala Wayanad Landslide : वायनाडमध्ये भूस्खलन २७० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू; नगरकरांनो आपत्तीग्रस्तांना द्या मदतीचा हात
Kerala Wayanad Landslide : वायनाडमध्ये भूस्खलन २७० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू; नगरकरांनो आपत्तीग्रस्तांना द्या मदतीचा हात

तत्काळ आवश्यक साहित्य –

कोरडा शिधा – (तांदूळ, डाळी, मसाले, साखर, चहा, रवा, सांबार पावडर), पाण्याच्या बाटल्या जार आणि बिस्किटे

इतर साहित्य – सॅनिटरी नॅपकिन्स, बेबी डायपर, मुलांचे कपडे, चादरी, ब्लँकेट, नवीन अंडर गारमेंट्स, साड्या, लुंगी, चप्पल, टॉवेल.

बचाव साहित्य – मॉस्किटो रिपेलेंट्स, वॉटर प्युरिफायर, टॅब्लेट- द्रव, मूलभूत औषधे, सौर दिवे, टॉर्च

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here