नगर : राज्याचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी विधानसभा निवडणुका घेतल्या जात आहेत. तश्याच पद्धतीने राज्यात आता दुसरी एक निवडणूक पार पडणार आहे. होय,शाळेतला वर्गमंत्री निवडण्यासाठी एक निवडणूक होणार आहे. मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही (Khaas Re TV) यांच्यातर्फे ‘वर्गमंत्री’ (Vargamantri) या वेब सीरिजची (Web Series) निर्मिती करण्यात आली आहे. नुकताच या वेब सीरिजचा ट्रेलर (Trailer Relese) सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. ८ नोव्हेंबरपासून ही वेबसेरीज आपल्या भेटीला येणार आहे.
नक्की वाचा : आमदार जगताप यांच्यामुळे नगरच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना : घुले
वर्गमंत्री मध्ये कोणकोणते कलाकार दिसणार ?(Khaas Re TV)
अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंट या निर्मिती संस्थेचे नरेंद्र फिरोदिया यांनी वर्गमंत्री या वेब सीरिजची निर्मिती केली आहे. अभिनेत्री अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या वेब सीरिजमध्ये झळकणार आहेत. संजय श्रीधर कांबळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या वेब सीरिजचं लेखन अजिंक्य म्हाडगूत, संकेत हेगाणा, प्रवीण कांबळे यांचं आहे. कृष्णा जन्नू यांनी संकलन, अजय घाडगे यांनी छायांकन, निरंजन पाडगावकर यांनी संगीत, श्रेयस एरंडे यांनी पार्श्वसंगीत तर सागर गायकवाड यांनी या वेब सिरीजची कला दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे.
अवश्य वाचा : लाल संविधान दाखवून तुम्ही कोणाला इशारा देताय? – देवेंद्र फडणवीस
ट्रेलरमध्ये नेमकं काय ?(Khaas Re TV)
विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच नागरिकशास्त्राचे धडे मिळावेत, लोकशाही प्रक्रिया समजावी,यासाठी शाळांमध्ये निवडणूक घेतली जाते. अशीच वर्गमंत्री पदासाठीची निवडणूक घेण्याचं शाळा ठरवते. त्यानंतर विद्यार्थ्यांची उमेदवारी,अर्ज भरणं, प्रचार, मतदान अशा सर्व प्रक्रिया पार पाडताना उडणारी धमाल वर्गमंत्री या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. ट्रेलरमधूनच ही सीरिज मनोरंजक असल्याचे दिसत आहेत.
मराठी वेब विश्वात ‘खास रे’ टीव्हीची वेगळी ओळख आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवरचा अस्सल मराठी कंटेट खास रे टीव्हीनं आतापर्यंत सादर केला आहे. त्यामुळे आता वेब सीरिजच्या क्षेत्रातही वर्गमंत्रीसारखी खास निर्मिती लक्षवेधी ठरणार आहे.