Khadakwasla Ultra 2025 : नगर : अहिल्यानगर रनर्स क्लब (ARC) ने अभिमानास्पद कामगिरी करत जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच ११ रनर्सनी अधिकृत प्रमाणपत्रासह १०० किमी अंतर पूर्ण करून खडकवासला अल्ट्रा मॅरेथॉन २०२५ (Khadakwasla Ultra 2025) मध्ये इतिहास रचला आहे. हा एक ऐतिहासिक पराक्रम असुन महाराष्ट्रातील सर्वात आव्हानात्मक मॅरेथॉनपैकी (Marathon) एक असलेली ही मॅरेथॉन शारीरिक आणि मानसिक सहनशक्तीची खरी परीक्षा घेते ११ ARC रनर्सनी एकत्रितपणे ही कामगिरी करून अहिल्यानगर जिल्ह्याच्या रनिंग क्षेत्रात नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.
१०० किमी कॅटेगरीमधून अहिल्यानगरमधील विलास भोजणे, संजय शेळके, हरीश काबरा, श्रीहरी तांबडे, निलेश संकलेचा, वैभव वाघ, गौतम जायभाय, डॉ. श्याम तारडे, प्रसाद तनपुरे, सूर्यकांत पारधी, विनायक दिकोंडा आणि योगेश खरपुडे या ११ रनर्सनी अंतर पार करत इतिहास रचला.
अवश्य वाचा : अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद; वनविभागाची कारवाई
यावेळी योगेश खरपुडे म्हणाले,
अहिल्यानगर रनर्ससाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. अहिल्यानगर रनर्स क्लब हा शहरातील एकमेव नॉन-कमर्शियल आणि केवळ रनर्सच्या विकास व मार्गदर्शनावर लक्ष केंद्रित करणारा क्लब आहे. अनुभवी तसेच नव्या रनर्सना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याचे कार्य सातत्याने करत आहे. टीम ARC ला हे यश मिळवण्यासाठी जगदीप मकर, योगेश खरपुडे, विलास भोजणे, गौतम जायभाय आणि डॉ.श्याम तारडे यांच्या योग्य मार्गदर्शनाने आणि प्रोत्साहनाने सर्व रनर्सनी सुरक्षितपणे व सक्षमपणे फिनिश करण्यास मोठी मदत झाली, असे त्यांनी सांगितले.
नक्की वाचा : कारमधून तब्बल एक कोटीची रोकड जप्त; संगमनेरमध्ये मोठी कारवाई
डॉ. श्याम तारडे म्हणाले की, (Khadakwasla Ultra 2025)
विविध अंतरांमधील फिनिशर्स आणि अधिकृत पोडियम स्थानासह, टीम ARC चे रनर्स चे सपोर्ट मिळाल्याने व मित्र परिवार यांचे प्रोत्साहन असल्याने खडकवासला अल्ट्रा २०२५ मधील यश हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या इतिहासातील अभिमानास्पद आणि प्रेरणादायी यश ठरले आहे, असे त्यांनी सांगितले.



