Kharg Island : अमेरिकन सैन्याचा इराणच्या महत्त्वाच्या खर्ग आयलँडवर वर हवाई हल्ला

Kharg Island : अमेरिकन सैन्याचा इराणच्या महत्त्वाच्या खर्ग आयलँडवर वर हवाई हल्ला

0
Kharg Island : अमेरिकन सैन्याचा इराणच्या महत्त्वाच्या खर्ग आयलँडवर वर हवाई हल्ला
Kharg Island : अमेरिकन सैन्याचा इराणच्या महत्त्वाच्या खर्ग आयलँडवर वर हवाई हल्ला

Kharg Island : नगर : अमेरिका-इराण युद्धाची (US-Iran War) झळ आता संपूर्ण जगाला सोसावी लागत आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. शुक्रवारी त्यांनी सांगितले की, अमेरिकन सैन्याने (US Military) इराणचा क्राउन ज्युल समजल्या जाणाऱ्या खर्ग बेटावर (Kharg Island) मोठा हल्ला केला. यामध्ये लष्करी तळांना लक्ष करण्यात आले आहे. तसेच यापुढे बेटावरील तेल प्रकल्पांना यापुढे लक्ष्य करू, असाही इशारा त्यांनी दिला.

नक्की वाचा : आता गॅस सिलिंडरचा पुरवठा होणार सुरळीत; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

बेटावर दररोज 70 लाख बॅरल तेल लोड करण्याची क्षमता

राणच्या उत्तरेकडील पर्शियन आखातात असलेले खर्ग बेट हे देशाच्या तेल निर्यातीचे सर्वात महत्त्वाचे केंद्र मानले जाते. या बेटातून इराणच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीपैकी सुमारे 90 टक्के निर्यात केली जाते. हे बेट हॉर्मुझची सामुद्रधुनीपासून सुमारे 483 किलोमीटर उत्तर-पश्चिमेला असून इराणच्या मुख्य भूभागापासून जवळपास 24 किलोमीटर अंतरावर आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या अहवालानुसार, या बेटावर दररोज सुमारे 70 लाख बॅरल तेल जहाजांवर लोड करण्याची क्षमता आहे. त्यामुळे खर्ग बेटावर झालेला हल्ला इराणच्या ऊर्जा व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

खर्ग बेट इराणचे आर्थिक केंद्रस्थान (Kharg Island)

ट्रम्प यांनी अलिकडेच म्हटलं की, अमेरिकन सैन्याने पर्शियन आखातात, इराणच्या मुख्य भूमीपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘खर्ग’ बेटावरील लष्करी ठिकाण्यांचा पूर्णपणे विध्वंस केला आहे. हे बेट इराणच्या तेल व्यापाराच्या केंद्रस्थानी असून इराणच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीचा बहुतांश भाग येथूनच हाताळला जातो. त्यामुळे हे बेट देशाच्या सर्वात महत्त्वाच्या आर्थिक जीवनवाहिन्यांपैकी एक बनले आहे. ट्रम्प यांनी असेही सांगितले की, या समुद्री मार्गावरून जाणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी अमेरिका लवकरच विशेष संरक्षण व्यवस्था उभी करणार आहे. इराण किंवा इतर कोणत्याही देशाने या मार्गात हस्तक्षेप केल्यास कठोर पावले उचलली जातील, असा इशाराही त्यांनी दिला.