नगर : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा कार्यकर्ता आणि बीडमधील कुख्यात गुंड असलेला सतीश उर्फ खोक्या भोसले (Khokya Bhosle) याला बुधवारी (ता.१२) बीड पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज (Prayagraj) येथून अटक (Arrest) केली आहे. एका इसमाला अर्धनग्न करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी खोक्यावर गुन्हा दाखल झाला होता. प्रयागराजमध्ये अटक करण्यात आल्याने त्याला लगेच महाराष्ट्रात आणता येणार नाही. आज त्याला प्रयागराज सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे. न्यायालयाने ट्रान्झिट रिमांड (Transit remand) मंजूर केल्यानंतर बीड पोलीस त्याला हवाईमार्गे बीडला नेणार आहेत.
नक्की वाचा : सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातील मुक्काम वाढला!
खोक्याला प्रयागराजच्या न्यायालयात का नेलं जाणार?(Khokya Bhosale)

या प्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत म्हणाले, “खोक्याला परराज्यातून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला तत्काळ महाराष्ट्रात आणता येणार नाही.आधी तिथल्या स्थानिक कोर्टाकडून ट्रान्झिट रिमांड घ्यावी लागेल. ट्रान्झिट रिमांड घेतल्यानंतर रस्तेमार्गे किंवा हवाईमार्गे, ज्या मार्गाने कमी वेळेत त्याला इथे आणता येईल,अशा मार्गाने त्याला बीडमध्ये आणलं जाईल.आज सायंकाळी किंवा उद्यापर्यंत त्याला बीडमध्ये आणलं जाईल. त्यानंतर त्याची चौकशी केली जाईल,अशी माहिती समोर आली आहे.
अवश्य वाचा : मोठी बातमी!खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
कायदेशीर प्रक्रिया काय?(Khokya Bhosale)
कायद्यातील तरतुदीनुसार,कोणत्याही गुन्हेगाराला दुसऱ्या राज्यात अटक झाली असेल तर त्याला प्राथमिक न्यायालयीन प्रक्रियेसाठी तिथल्या स्थानिक न्यायालयात हजर केलं जातं. त्यानंतर न्यायालय त्याला ट्रान्झिट रिमांड देऊ शकतं. त्यामुळे खोक्याची प्रयागराज न्यायालयात प्राथमिक सुनावणी होणार आहे. प्रयागराज न्यायालयात प्रारंभिक न्यायिक कार्यवाही आटोपल्यानंतर आरोपीला महाराष्ट्रात प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. तिथल्या न्यायालयाने त्याची ट्रान्झिट रिमांड दिल्यानंतर महाराष्ट्रातील न्यायालयात म्हणजेच बीडमध्ये पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली जाईल.