Khokya Bhosle: बसमध्ये चोऱ्या करणारी रिलस्टार कोमल आहे खोक्याची भाची 

0
Khokya Bhosle: बसमध्ये चोऱ्या करणारी रिलस्टार कोमल आहे खोक्याची भाची 
Khokya Bhosle: बसमध्ये चोऱ्या करणारी रिलस्टार कोमल आहे खोक्याची भाची 

Khokya Bhosle : अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बसमधून महिलांच्या पर्स चोरी करणाऱ्या एका सराईत जोडप्याला जेरबंद केले आहे. हे जोडपे रिलस्टार (Reel Star) आहे. यातील महिला चक्क बीड(Beed) जिल्ह्यातील सराईत आरोपी खोक्या भोसलेची भाची (Khokya Bhosale’s niece)असल्याचे समजते. कोमल काळे (Komal Kale) असे तिचे नाव आहे.

नक्की वाचा: महाराष्ट्रातील राजभवनचे नाव बदलले, ‘लोकभवन’ म्हणून मिळाली नवी ओळख

नेमकं प्रकरण काय ? (Khokya Bhosle)

पाथर्डी-कल्याण बसमध्ये एका महिलेची पर्स चोरीला गेली होती. या चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत होते. यावेळी त्यांना माहिती मिळाली की, बसमध्ये चोरी करणारी महिला पाथर्डी बसस्थानक परिसरात आली आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचत कोमलला ताब्यात घेतले. तिच्याकडे अधिक विचारपूस केली असता तिने चोरीची कबुली दिली. तसेच ही चोरी तिचा प्रियकर रिलस्टार सुजित राजेंद्र चौधर याच्या मदतीने केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले.

अवश्य वाचा : जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देशात नंबर १ कोण ? वाचा सविस्तर… 

कोमलची गुन्हेगारी पार्श्वभूमी  (Khokya Bhosle)

कोमलवर यापूर्वी तीन तर सुजितवर यापूर्वी आठ गुन्हे दाखल आहेत. या ‘बंटी-बबली’ च्या जोडीकडून पोलिसांनी नऊ लाख ३५ हजार २३० रुपयांचा किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात साडेसहा तोळे सोन्याचे दागिने, दीड लाखांहून अधिक किमतीचा आयफोन १७ प्रो मॅक्स आणि इतर रोख रक्कम व मोबाईलचा समावेश आहे. कोमलने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर खोक्या भोसले बरोबरचे फोटो अपलोड केले आहेत. यात ती खोक्याची ओळख मामा म्हणून करून देत असल्याचे समजते. प्राण्यांची हत्या, जीवघेणे हल्ले या प्रकरणात खोक्या मागील काही महिन्यांपूर्वी राज्यभर गाजला होता. त्याची कोमल भाची असल्याचे समजताच पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.