Kidnapping : श्रीगोंदा: नाशिक येथील द्राक्ष व्यापाऱ्याचे श्रीगोंदा काष्टी रस्त्यावरील शेंडगेवाडी परिसरातून चार इसमांनी अपहरण (Kidnapping) करून काष्टीकडे पसार झाल्याची घटना घडली. गाडीला कट मारल्याचे कारण सांगत मारहाण (Beating) करत रात्री सात ते पावणे आठ वाजण्याच्या सुमारास हे अपहरण करण्यात आले. सौरभ रमेश शेवाळे (रा.कळवण, जि.नाशिक) असे अपहरण झालेल्या द्राक्ष व्यापाऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस (Police) उपनिरीक्षक समीर अभंग यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
नक्की वाचा : अजय महाराज बारस्कर यांचे मनोज जरांगेंवर पुन्हा गंभीर आरोप
कट मारल्याचे सांगत मारहाण व अपहरण (Kidnapping)
नाशिक येथील द्राक्ष व्यापारी सौरभ रमेश शेवाळे हे श्रीगोंदा शहराजवळील एका हाॅटेलमध्ये मुक्कामी असल्याने संध्याकाळी श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील द्राक्ष एजंट सागर नवले हे त्यांना सोडण्यासाठी काष्टी रस्त्याने जात असताना शेंडगेवाडी परिसरातील पेट्रोल पंपाजवळ चारचाकी गाडीत पाठीमागून आलेल्या चार अनोळखी इसमांनी शेवाळे यांच्या चारचाकी गाडीला गाडी आडवी लावली. गाडीला कट मारल्याचे कारण करत गाडीतील सौरभ शेवाळे तसेच द्राक्ष एजंट सागर नवले या दोघांना मारहाण करू लागले. यावेळी घाबरलेले नवले तेथून पळून गेल्याने मारहाण करत असलेल्या चार अनोळखी इसमांनी शेवाळे यांना त्यांच्याच गाडीत टाकून त्यांचे अपहरण करत काष्टीच्या दिशेने पसार झाले.
अवश्य वाचा : राज ठाकरेंकडे शिवसेनेचं नेतृत्व नकोच; शिंदे गटातील नेत्यांचा विरोध
पोलिसांकडून शोध सुरु (Kidnapping)
घाबरलेल्या सागर नवले यांनी तत्काळ श्रीगोंदा पोलीस ठाण्याशी संपर्क साधत घटनेबाबत माहिती दिली. घटनेची माहिती समजताच पोलीस उपनिरिक्षक समीर अभंग यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत अपहरणकर्त्यांचा पाठलाग केला. मात्र, ते मिळून आले नाही. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.