Kidnapping : अल्पवयीन मुलाचे अपहरण प्रकरणातील दोन आरोपी जेरबंद

Kidnapping : अल्पवयीन मुलाचे अपहरण प्रकरणातील दोन आरोपी जेरबंद

0
Kidnapping : अल्पवयीन मुलाचे अपहरण प्रकरणातील दोन आरोपी जेरबंद
Kidnapping : अल्पवयीन मुलाचे अपहरण प्रकरणातील दोन आरोपी जेरबंद

Kidnapping : शेवगाव : एका अल्पवयीन मुलाला दोन जणांनी शेवगाव शहरातून बळजबरीने उचलून नेत (Kidnapping) मारहाण व दमदाटी करण्यात आली. त्यानंतर त्यास ढोरजळगाव येथे सोडून देण्यात आले. अल्पवयीन मुलाच्या फिर्यादीवरून (Complaint) सलमान अल्ताफ इनामदार (रा. शेवगाव) व एक अल्पवयीन मुलाला शेवगाव पोलिसांनी (Police) छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलाला नोटीस बजावण्यात आली आहे.

नक्की वाचा : माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार;केंद्र सरकारचा निर्णय  

फिर्यादीत म्हटले आहे की,

शहरातील नाईकवाडी मोहल्ला या भागात राहणारा सात वर्षांचा अल्पवयीन फिर्यादी हा बुधवारी (ता. २५) दुपारी मिरी रस्त्यावरील पेट्रोलपंपावर गेला असता त्यास सलमान इनामदार व एका अल्पवयीन मुलाने बळजबरीने दुचाकीवरून पळवून नेले. ढोरजळगाव येथे गेले असता त्यास मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली. याबाबत कोणाला काही सांगू नये म्हणून दमदाटी देखील करण्यात आली. त्यानंतर त्याला तेथेच सोडून दोघे पसार झाले.

अवश्य वाचा : “मुख्यमंत्री साहेब,आरोपींना पाठीशी घालू नका,अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल”- मनोज जरांगे

इनामदारला अटक करून अल्पवयीन मुलाला नोटीस (Kidnapping)

त्यानंतर फिर्यादीने शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये येऊन इनामदार व एका अल्पवयीन मुलाविरुध्द गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी दोन पोलीस पथके तयार करून आरोपींचा शोध घेत त्यांना छत्रपती संभाजीनगर येथून दुचाकीसह ताब्यात घेतले. सलमान इनामदार याला अटक करून अल्पवयीन मुलाला नोटीस दिली.