Kidnapping : नगर : उद्योजकाचे अपहरण (Kidnapping) करणार्या निखिल राजकुमार लून (रा. नवजीवन कॉलनी, मार्केटयार्ड जवळ, अहिल्यानगर) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस (Police) ठाण्यात महाराष्ट्र (Maharashtra) सावकारी अधिनियम कलम ३९ नुसार गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. येथील उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अल्ताफ अब्दुल कादर शेख (वय ४३) यांनी फिर्याद दिली आहे.
नक्की वाचा : मराठी लोकसंस्कृतीचा अभिमान जोपासणे गरजेचे : उद्योजक नरेंद्र फिरोदिया
प्लॉटच्या व्यवहारातून केले होते अपहरण
दरम्यान, निखिल याने महेश यांचे प्लॉटच्या व्यवहारातून अपहरण केले होते. त्याच प्रकरणात सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तशी तक्रार महेश यांनी उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे केली होती. तक्रार अर्जाची चौकशीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक कराटे स्पर्धा : सचिन जाधव
१० % दराने १० लाख घेतले होते (Kidnapping)
महेश यांनी ९ मार्च २०२१ रोजी निखिल कडून १० टक्के दराने १० लाख तातडीच्या कामासाठी घेतले होते. त्याच्या सुरक्षिततेसाठी महेश यांनी त्यांच्या मालकीच्या वडगाव गुप्ता येथील प्लॉटचे रजिस्टर साठेखत तयार केले होते. यानंतर, महेश यांनी २० सप्टेंबर २०२२ पर्यंत निखिल च्या खात्यात आरटीजीएसव्दारे ३४ लाख २५ हजार रूपये जमा केले. तरीही, साठेखत रद्द करण्यात आले नाही. महेश यांनी २२ मार्च २०२४ रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार केली. चौकशी अंती निखिलने सदर रक्कम सावकारी स्वरूपात घेतली आहे हे स्पष्ट झाले. त्यामुळे उपनिबंधक सहकारी संस्था यांनी अल्ताफ अब्दुल कादर शेख यांना सरकार तर्फे फिर्याद देण्यास सांगितले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.