Kidnapping : पाथर्डी : शहरात परप्रांतीय व्यापाऱ्यांचे अपहरण (Kidnapping) करून त्यांना मारहाण (Beating) करत लुटमार करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना (Criminals) पाथर्डी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जेरबंद केले आहे.
नक्की वाचा : माहेरी गेलेल्या पत्नीचा परत येण्यास नकार; पतीची चार मुलांना विहीरीत ढकलून आत्महत्या
यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अंकुश नवनाथ मडके (वय ३६), शुभम अंबादास कराड (वय २३), केतन दिगंबर जाधव (वय २९, सर्व रा. शिक्षक कॉलनी, पाथर्डी), सुहास काशिनाथ ढाकणे (वय ३४, रा. एडके कॉलनी, पाथर्डी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अवश्य वाचा : लग्नाळू युवकाची फसवणूक; सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पत्नी पसार
आरोपींनी त्यांचे गाडीसह केले अपहरण (Kidnapping)
१६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता उत्तर प्रदेशातील अजयसिंग रजसिंग नायक, सुनिलकुमार छत्तरसिंग नायक आणि यादसिंह बालकिशन नायक हे तिघे त्यांच्या वाहनातून पाथर्डी शहरातील अहिल्यानगर रोडवरील शंकर नगर येथे वस्तू विक्रीसाठी आले होते. यावेळी नऊ आरोपींनी त्यांचे गाडीसह अपहरण केले. आरोपींनी व्यापाऱ्यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम, दोन मोबाईल फोन, गॅस शेगडी, होम थिएटर, कुलर आदी वस्तूंसह एकूण ४९ हजार रुपयांचा माल लुटला. तसेच त्यांच्याकडून सात हजार पाचशे रुपये गुगल पे द्वारे हस्तांतरित करून घेतले. यानंतर, आरोपींनी व्यापाऱ्यांना वाहनात बसवून अहिल्यानगर रस्त्यावर नेत असताना त्यांचे वाहन समोरून येणाऱ्या दुसऱ्या चारचाकी वाहनाला धडकले. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले तसेच प्रवाशांना दुखापती झाल्या. याबाबत गुन्हा दाखल होताच पाथर्डी पोलिसांनी चार स्वतंत्र पथके स्थापन करून तपास सुरू केला. पोलिसांनी प्रथम अंकुश मडके याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून इतर आरोपींची नावे उघड केली. त्यानंतर शुभम कराड, केतन जाधव, सुहास ढाकणे यांना अटक करण्यात आली आहे.