Kidnapping : नगर : राहाता येथे हत्याराचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी (Death Threat) देत अपहरण (Kidnapping) करून १० लाखांची खंडणी मागणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने पुणे येथून जेरबंद केली आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबटप्रवण क्षेत्रातील शाळांच्या वेळेत बदल
ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे
ओम अशोक ठोंबरे (वय २०, रा. ता. हवेली, जि.पुणे, मुळ रा. देवगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर), अजय शंकर हुलावळे (वय २१, रा.कोथरूड जि.पुणे), आदित्य रावसाहेब गागरे (वय १९, रा. तांभेरे, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर), साई परमेश्वर ढवळे (वय १८, रा. भेंडा, ता. नेवासा, जि.अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांनी हा गुन्हा अजय शंकर हुलावळे, रामेश्वर , कोथरूड, जि.पुणे), रोहित रुईकर (रा. भेंडा, ता. नेवासा) यांच्यासह केला असल्याचे ची पोलीस तपासत समोर आले आहे.
नक्की वाचा : अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या : आमदार संग्राम जगताप
अपहरण करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल (Kidnapping)
फिर्यादी हे बापुसाहेब रामदास गागरे (वय -३९) रा.तांभोरे ता. राहुरी जि.अहिल्यानगर) हे १३ ऑक्टोबर रोजी त्यांचे घरातुन ड्रायव्हरला घेणेकामी वाकडी ता.राहाता येथे जात असतांना एक पांढ-या रंगाची चारचाकी वाहनाने पाठलाग करुन निळवंडे कॅनल च्या जवळ हत्याराचा धाक धाकवुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. बळजबरीने गाडीमध्ये बसवून एका निर्जन ठिकाणी एका गोडाउन मध्ये घेऊन गेले. मारहाण करून दहा लाखाची खंडणी मागितली. फिर्यादी पैसे देतो असे म्हटले असता संशयितांनी डोळ्याला पट्टी बांधुन शनिशिंगणापुर फाट्याजवळ सोडुन दिले. जर तु पैसे दिले नाही, तर तुला व तुझ्या कुटुंबाला ठार मारून टाकू अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले होते. या बाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपहरण करून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचा समांतर तपास करत असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा ओम ठोंबरे याने त्याच्या साथीदारांसह केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून कोथरूड (ता. जि पुणे ) येथून ताब्यात घेतल. संशयित आरोपिंना अधिक तापासाठी राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, रमिजराजा आत्तार, प्रशांत राठोड, विशाल तनपुरे, महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत, चालक अरुण मोरे यांच्या पथकाने केली.



