Kidnapping : शेवगाव : तालुक्यातील तीन शाळकरी अल्पवयीन मुलींचे त्याच गावातील एका तरुणाने अपहरण (Kidnapping) केले होते. दरम्यान, त्या मुलींच्या शोधार्थ शेवगाव व स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) स्वतंत्र पथके (Squad) तयार करुन रवाना केले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित युवकास सुपा (ता.पारनेर ) येथून ताब्यात घेत त्या मुलींची सुटका केली.
हे देखील वाचा: नगर लोकसभा निवडणुकीत आता दुरंगी लढत; नाटयमय घडामाेडीनंतर भल्याभल्यांची सपशेल माघार
अनेक जिल्ह्यांमध्ये शोधाशोध (Kidnapping)
१९ एप्रिल रोजी त्या तीन मुलींचे अपहरण करण्यात आले होते. तब्बल नऊ दिवस स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी पथकांनी पुणे, मुंबई, धाराशिव, बीड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, पिंपरी, चिंचवड आदी ठिकाणी जाऊन आरोपीचे मित्र, नातेवाईक यांच्याकडे शोध घेत, आरोपी व अपहरण झालेल्या मुलींची माहिती घेतली. याच दरम्यान वेगवेगळ्या दोनशे ते तीनशे ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपीच्या राहते घरी तसेच अपहरण झालेल्या मुलींचे घराचे आजुबाजुचे तांत्रिक विश्लेषणाचे आधारे माहिती घेतली होती. शेवगाव शहरातील तसेच अहमदनगरकडे जाणाऱ्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदर आरोपी हा तीन मुलींना मोटारसायकवर घेऊन जातांना शेवगाव ते नगर रोडवरील मराठवाडी या गावापर्यंत दिसून आला होता.
नक्की वाचा: ‘देवेंद्र फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात तो सत्तेचा गैरवापर’-रोहित पवार
माहितीनुसार कारवाई करत घेतले ताब्यात (Kidnapping)
दरम्यान, पोलीस पथके आरोपीची माहिती काढत असताना रविवारी (ता.२८) सुपा परिसरातील एका महिलेने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना फोनवरुन तीन मुली व एक मुलगा सुपा परिसरामध्ये असल्याची माहिती दिली. त्यानुसार दिनेश आहेर यांनी तत्काळ पथकास मिळालेली माहिती कळवून तीन मुली व त्यांचे सोबत असलेल्या मुलाचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने सुपा परिसरामध्ये जावून तीन मुलींचा व सोबत असलेल्या मुलाचा शोध घेत सदर तीन अल्पवयीन मुली व त्या मुलास ताब्यात घेतले आहे. पोपट शहादेव बोरुडे (वय २०) असे ताब्यात घेण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक तुषार धाकराव, सोपान गोरे, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, रविंद्र कर्डीले, सचिन अडबल, संदीप चव्हाण, फुरकान शेख, संतोष खैरे, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर, भरत बुधवंत, विजय धनेधर, महिला पोलीस अंमलदार छाया माळी यांच्या पथकाने केली. ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन तीन मुली व आरोपी यास पुढील तपासकामी शेवगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास शेवगाव पोलीस करीत आहेत.