Kidnapping : नगर : मौज-मजा व नशा करण्यासाठी रात्रीच्या वेळी प्रवाशाचे अपहरण (Kidnapping) करून लुटणाऱ्या (Robbery) आरोपीला कोतवाली पोलिसांनी (Police) जेरबंद केले. अनिकेत शंकर वाकळे (वय २३, रा. काटवण खंडोबा, महात्मा फुले वसाहत, नगर) असे जेरबंद आरोपीचे (Accused) नाव आहे. त्याचा साथीदार सुरज केदारे (रा. बोल्हेगाव, नगर) हा पसार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
नक्की वाचा: अर्थसंकल्पात मोठी घोषणा! विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांचं शैक्षणिक कर्ज
निर्जनस्थळी मारहाण करत लुटले
बीड जिल्ह्यातील प्रवासी अनिल हाडे हे १४ जुलै रोजी रात्री साडेबारा वाजता पुणे बस स्थानकासमोर बीडकडे जाणाऱ्या वाहनाची वाट पाहत उभे होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी अनिल हाडे यांना बळजबरीने दुचाकीवर बसविले. त्यांना आर्मी एरियात नेऊन त्यांच्याकडील कागदपत्रे, एटीएम कार्ड, मोबाईल व ९०० रुपये रोख काढून घेतले. त्यानंतर अनिल हाडे यांना मारहाण करत एटीएमचा पासवर्डही जाणून घेतला. त्या आधारे बँकेतील एक लाख ४४ हजार रुपये काढून घेतले. या संदर्भात अनिल हाडे यांनी दोन्ही अज्ञातांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.
अवश्य वाचा: मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सरकार १०० टक्के रक्कम भरणार – अजित पवार
मौजमजा करण्यासाठी गुन्हा केल्याची कबुली (Kidnapping)
या प्रकरणाचा तपास करताना कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांना माहिती मिळाली की, हा गुन्हा अनिकेत वाकळे व त्याच्या साथीदाराने केला आहे. त्यानुसार पथकाने शोध घेऊन आरोपी अनिकेतला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. नशा करून मौजमजा करण्यासाठी व गर्लफ्रेंडला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी दोघांनी हा गुन्हा केल्याचे त्याने पथकाला सांगितले.