Kidnapping : नगर : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील ग्रामपंचायत सदस्याला रिव्हॉल्वरचा (Revolver) धाक दाखवून त्यांचे अपहरण (Kidnapping) करण्यात आले होते. या प्रकरणातील चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले. किशोर सोमनाथ सांगळे (वय २७, रा. सिद्धटेक, ता. कर्जत), सागर चिमाजी देमुंडे (वय २७, रा. आळसुंदे, ता. कर्जत), प्रतीक राजेंद्र पवार (वय २५, रा. सोनार गल्ली, ता. कर्जत) व महेंद्र अरुण गोंडसे (वय २६, रा. जोगेश्वरवाडी, ता. कर्जत) अशी जेरबंद आरोपींची (Accused) नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार पसार आहेत.
अवश्य वाचा : भंडारदरा धरण ९० टक्के भरले; काेणत्याही क्षणी पाणी साेडण्याची शक्यता
सरपंचपदावरील अविश्वास ठराव मंजूर होऊ नये म्हणून अपहरण
आढळगाव येथील हॉटेल व्यावसायिक दीपक राऊत हे त्यांच्या चारचाकी वाहनातून माहिजळगाव बायपास (ता. कर्जत) आले होते. ते पाण्याची बाटली घेण्यासाठी वाहनातून खाली उतरले. त्यावेळी त्यांच्या वाहनाच्या मागे शिवप्रसाद उबाळे याने दोन चारचाकी वाहने आणून थांबवली. त्या दोन्ही चारचाकी वाहनातून उतरलेल्या व्यक्तींनी आढळगाव ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदावरील अविश्वास ठराव मंजूर होऊ नये, या उद्देशाने राऊत यांच्या वाहनातील ग्रामपंचायत सदस्य नितीन बन्सी गव्हाणे यांना मारहाण केली. तसेच रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्यांचे अपहरण केले. या संदर्भात राऊत यांनी मिरजगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अपहरण, अवैध शस्त्र बाळगणे, मारहाण करण्यासंदर्भातील गुन्हे दाखल करून घेतले.
नक्की वाचा : ‘गोदावरी’च्या नूतनीकरणासाठी २०० कोटीचा निधी द्या; मंत्री विखेंची फडणवीसांकडे मागणी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई (Kidnapping)
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली होती की, हा गुन्हा किशोर सांगळे व त्याच्या साथीदारांनी केला आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिद्धटेक येथून किशोर सांगळेला जेरबंद केले. त्याच्याकडे पथकाने अधिक विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार त्याचे आणखी तीन साथीदार पथकाने जेरबंद केले. मात्र, त्याचे साथीदार अमोल भोसले (रा. सिद्धटेक, ता. कर्जत) व माऊली ज्ञानेश्वर उबाळे (रा. आढळगाव, ता. श्रीगोंदा) हे पसार आहेत. त्यांचा शोध पथक घेत आहे. पथकाने पुढील तपासासाठी चारही जेरबंद आरोपींना मिरजगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.