Kidnapping : अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची १२ तासांत सुटका; कोतवाली पोलिसांची कामगिरी

Kidnapping : अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची १२ तासांत सुटका; कोतवाली पोलिसांची कामगिरी

0
Kidnapping : अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची १२ तासांत सुटका; कोतवाली पोलिसांची कामगिरी
Kidnapping : अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची १२ तासांत सुटका; कोतवाली पोलिसांची कामगिरी

Kidnapping : नगर : शहरातून अपहरण (Kidnapping) झालेल्या अल्पवयीन मुलीची कोतवाली पोलिसांची (Police) वेगवान तपास करत अवघ्या १२ तासांत सुटका केली. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी कर्जत (जि. रायगड) (Raigad) मधून ताब्यात घेतले.

नक्की वाचा: ‘आमचा मुलगा निर्दोष आहे’,बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांचा मोठा दावा

तातडीने तपास केला सुरू

नगर शहरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पोलीस उपअधीक्षक अमोल भारती व कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी तातडीने तपास सुरू केला. अल्पवयीन मुलीचे एका अल्पवयीन मुलाने अपहरण केले आहे. त्या मुलाजवळ पैसे नाहीत, अशी माहिती पोलीस निरीक्षक दराडे यांना समजली. त्यानुसार मुलीच्या सुटकेसाठी पोलीस निरीक्षक दराडे यांनी पथक तयार केले.

अवश्य वाचा: ‘बदलापूरच्या घटनेत राजकारण आहे म्हणणारेही विकृत’; उद्धव ठाकरेंचा संताप

कर्जत रेल्वे पोलिसांच्या मदतीने अल्पवयीन मुलीची सुटका (Kidnapping)

या पथकाने अल्पवयीन मुलाचे नातेवाईक व मित्रांकडे चौकशी सुरू केली. त्या मुलाने त्याच्या एका मित्राला पैसे मागितल्याचे पथकाला समजले. त्या मित्राकडे पथकाने अधिक तपास केला असता हा मुलगा त्याच्या आणखी एक मित्रासह मुलीला घेऊन कर्जत रेल्वेस्टेशनवर असल्याचे कळाले. त्यानुसार पथकाने कर्जत येथे जाऊन कर्जत रेल्वे पोलिसांच्या मदतीने अल्पवयीन मुलीची सुटका केली. तसेच आरोपी मुलाला ताब्यात घेतले.