Kidnapping : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करणारा आरोपी गजाआड

Kidnapping : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करणारा आरोपी गजाआड

0
Kidnapping : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करणारा आरोपी गजाआड
Kidnapping : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करणारा आरोपी गजाआड

Kidnapping : नगर : अल्पवयीन मुलीचे अपहरण (Kidnapping) करून बलात्कार (Rape) करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी (Police) आज (ता. १) जेरबंद केले. चेतन संतोष सरोदे (रा. गांधीनगर, बोल्हेगाव, नगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याला नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथून कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेत अल्पवयीन मुलीची सुटका केली.

नक्की वाचा: देशी गायी यापुढे ‘राज्यमाता-गाेमाता’ म्हणून घाेषित; राज्य शासनाचा निर्णय

छायाचित्रे काढत व्हायरल करण्याची धमकी

अल्पवयीन मुलगी कॉलेज कामानिमित्त २६ सप्टेंबरला दुपारी १२.३० वाजता बुरुडगाव रस्त्यावर आली होती. त्यावेळी आरोपी चेतन सरोदेने तिला बळाचा वापर करत वाहनावर बसवून बोल्हेगाव येथे नेले. तिथे एका खोलीत तिला मारहाण करत बलात्कार करण्यात आला. तिची छायाचित्रे काढत व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या संदर्भात मुलीच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी आरोपी व पीडित मुलीच्या शोधासाठी तातडीने पथक रवाना केले.

अवश्य वाचा: राज्यातील सर्व शाळांना आता नवीन नियम;’या’ दिवसापासून नियम लागू

पथकाने सापळा रचून आरोपीला घेतले ताब्यात (Kidnapping)

पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे माहिती घेतली असता चेतन सरोदे हा त्याच्या मामाच्या गावी भानसहिवरा येथे असल्याचे पथकाला कळाले. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. तसेच अल्पवयीन मुलीची सुटका केली. आरोपी व अल्पवयीन मुलीला पथकाने कोतवाली पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी मुलीच्या जबाबावरून कोतवाली पोलिसांनी बलात्कार, जीवे मारण्याची धमकी, बाल लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करून घेत आरोपीला अटक केली.