Kidnapping : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणारा जेरबंद

Kidnapping : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणारा जेरबंद

0
Kidnapping : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणारा जेरबंद
Kidnapping : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणारा जेरबंद

Kidnapping : नगर : शहरातील माळीवाडा परिसरातील शाळेसमोरून अल्पवयीन मुलीचे अपहरण (Kidnapping) करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी (Police) राहुरी बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. तसेच अल्पवयीन मुलीची (Minor Girl) सुटका केली.

अवश्य वाचा: पुण्यात दोन चिमुरड्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार

कोतवाली पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद

स्टेशन रस्ता परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला तिच्या वडिलांनी शाळेसमोर सोडून कामाला निघून गेले. मात्र, शाळेतील शिक्षकांनी मुलगी शाळेत आली नसल्याचे तिच्या घरी कळवले. त्या वरून मुलीच्या वडिलांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची फिर्याद दिली होती.

नक्की वाचा: दुर्गामाता दौडीत नारीलाच नाकारले,संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

राहुरी बसस्थानकातून घेतले ताब्यात (Kidnapping)

फिर्याद दाखल होताच कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी अल्पवयीन मुलीच्या शोधासाठी पथक रवाना केले. पथकाने तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांकडून माहिती काढली. त्यावरून पथकाने ओमकार गायकवाड या १९ वर्षीय युवकाला राहुरी बसस्थानकातून ताब्यात घेतले. तसेच त्याच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीची सुटका केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कैलास कपिले करत आहेत.