Kidnapping : नगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील पश्चिम मतदार संघामधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अपह्रत (Kidnapping) उमेदवाराची सुटका नारेगाव चिखलठाणा परिसरातून अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने सुटका केली आहे.
अवश्य वाचा: “६ नोव्हेंबरपासून राहुल गांधी, मी आणि उद्धव ठाकरे प्रचार सुरु करतोय” : शरद पवार
अपक्ष उमेदवारी अर्ज केला होता दाखल
राजु धर्माजी शिंदे, (वय ४९, रा.करोडी, ता.जि.छत्रपती संभाजीनगर) असे अपह्रत झालेल्या उमेदवाराचे नाव आहे. याबाबत मंगेश काशिनाथ जाधव, (वय २९, रा.करोडी, ता.जि.छत्रपती संभाजीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. फिर्यादीत म्हटले केली, विधानसभेसाठी छत्रपती संभाजीनगर (पश्चिम) मतदार संघातून राजू शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानतर ते नातेवाईकांसोबत शिर्डी येथे देवदर्शनाकरीता आले होते. रविवार (दि. 3) रोजी दुपारी साडेतीन वाजता शिर्डीहून नाशिककडे जात असताना संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे चारचाकी वाहनातून ८ ते १० अनोळखी व्यक्तीने राजू धर्माजी शिंदे यांना तु उमेदवारी अर्ज मागे घेणार आहे, की नाही असे विचारून त्यांना, तसेच त्यांची पत्नी चंद्रकला राजू शिंदे, बहीण ताराबाई किशोर तुपे व दाजी किशोर तुपेर यांना पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले होते. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेने अपहृत व्यक्तीला घेतले ताब्यात (Kidnapping)
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार राजू शिंदे हा नारेगाव चिकलठाणा परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्या नुसार पथकाने सापळा रचून अपह्रत व्यक्तीला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता अपहरण झाले नसल्याचे त्यांनी पोलीस जबाबात सांगितले.