Kidnapping : अपहरण करणारे आरोपी २४ तासात जेरबंद

Kidnapping : अपहरण करणारे आरोपी २४ तासात जेरबंद

0
Kidnapping : अपहरण करणारे आरोपी २४ तासात जेरबंद
Kidnapping : अपहरण करणारे आरोपी २४ तासात जेरबंद

Kidnapping : शेवगाव : शेवगाव पोलिसांनी (Police) अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन अपहरण (Kidnapping) करणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेऊन २४ तासाच्या आत जेरबंद केले आहे. त्यामुळे शेवगाव (Shevgaon) पोलिसांचे कौतुक होत आहे.

नक्की वाचा : कांद्यावरील निर्यात शुल्क हटवा ; खासदार नीलेश लंके यांची पियुष गोयल यांच्याकडे मागणी

बळजबरीने वाहनात टाकून नेले होते पळवून

शेवगाव तालुक्यातील वाडेगव्हाण येथील मनीषा अप्पासाहेब काजळे (रा. वाडेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १८ डिसेंबर रोजी त्यांचे पती आप्पासाहेब भानुदास काजळे (वय ५४, रा. वाडगव्हाण, ता. शेवगाव) यांना बोधेगाव येथून अज्ञात दोन-तीन व्यक्तींनी बळजबरीने वाहनात टाकून पळवून नेले, अशी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने शेवगाव पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांनी वेगवेगळी तीन पथके तयार करून सांगली, बीड, पैठण या ठिकाणी रवाना केली होती.

अवश्य वाचा : ‘तो’ अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याची हयगय केली जाणार नाही – अजित पवार

तांत्रिक तपासाच्या साह्याने आरोपी ताब्यात (Kidnapping)

अपहरण करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेत असताना तांत्रिक तपासाच्या साह्याने शेवगाव पोलिसांना असे कळाले की बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे अपहरण केलेल्या व्यक्तीला डांबवून ठेवले आहे. माहितीच्या अनुषंगाने शेवगांव पोलिसांनी शिरूर येथे जाऊन संबंधित अपहरण झालेली व्यक्ती व आरोपी सोमनाथ बाबूश्या जाधव (रा.औरंगपूर, ता. शिरूर कासार, जि.बीड) याला ताब्यात घेतले. ही कारवाई शेवगाव पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.