Kidnapping of a Minor Girl : नगर : अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता (Missing) झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) अपहरणाचा गुन्हा (Kidnapping of a Minor Girl) दाखल करण्यात आला आहे.
नक्की पहा : कोपरगावात युवकाचा दगडाने ठेचून खून
राहत्या घरातून मुलगी अचानक बेपत्ता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास केडगाव येथील राहत्या घरातून संबंधित मुलगी अचानक बेपत्ता झाली. नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला; मात्र ती आढळून न आल्याने अखेर पोलिसांत धाव घेतली.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल (Kidnapping of a Minor Girl)
फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुलगी ही फिर्यादीची नातेवाईक असून तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलिसांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी संबंधित मुलगी दिसल्यास तत्काळ कोतवाली पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



