Kidnapping of Minor Girl : पाथर्डी : तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण (Kidnapping of Minor Girl) झाल्याची घटना घडली होती. मात्र, पाथर्डी पोलिसांनी (Pathardi Police) तत्परता दाखवत अवघ्या २४ तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावून मुलीची सुखरूप सुटका करत तिला आई-वडिलांच्या स्वाधीन केले. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने बुधवारी (ता. १) पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल (Complaint Filed) केली होती.
अवश्य वाचा : अरेच्चा! सरकारच्या २६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी
एका तरूणाचा मुलीशी फोन होत असल्याचे निदर्शनास
फिर्यादीनुसार, संबंधित मुलगी ही अहिल्यानगर येथे इयत्ता ११ वीमध्ये शिक्षण घेत असून ती ये-जा करत होती. २७ मार्चला शेवटचा पेपर संपल्यानंतर ती वडिलांसोबत घरी आली होती. त्याच दिवशी दुपारी आई-वडील शेतात कामासाठी गेल्यानंतर मुलगी घरी एकटी होती. आई-वडील सायंकाळी घरी परत आल्यानंतर मुलगी घरात आढळून आली नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी गावातील एका तरूणाचा या मुलीशी फोन होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी नातेवाईकांनी संबंधित तरूणाला समज दिली होती.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम (Kidnapping of Minor Girl)
३१ मार्च सायंकाळी सुमारे ६.३० वाजता मुलीने आपल्या आजोबांच्या मोबाईलवरून फोन करून मला घरी यायचे आहे, मला जबरदस्तीने आणले असून तो दमदाटी करत आहे असे सांगितले. यावरून मुलीचे अपहरण झाल्याची खात्री कुटुंबीयांना पटली. त्यानुसार मुलगी अल्पवयीन असल्याची जाणीव असूनही मुलीला पळवून नेल्याची फिर्याद देण्यात आली. घटनेची दखल घेत पाथर्डी पोलिसांनी तांत्रिक तपासणी व गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली. अखेर अवघ्या २४ तासांत मुलीचा शोध लावण्यात यश आले. पोलिसांनी मुलीची सुखरूप सुटका करून तिला आई-वडिलांच्या स्वाधीन केले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर यांनी केला.



