Kidnapping of Minor Girls : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील दोन गावांमधून दोन दिवसांत दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या (Kidnapping of Minor Girls) घटना समोर आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात (Ahilyanagar Taluka Police Station) अपहरणाचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल (Crime Registered) करण्यात आले आहेत.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
अज्ञात व्यक्तीविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल
तालुक्यातील एका गावात राहणारे ४८ वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. त्यांच्या मुलीला (वय १७) सोमवारी सकाळी ११.३० ते १२.३० वाजताच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले. याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी मुलीचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने दुसऱ्या दिवशी अहिल्यानगर तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
हे पहा : शेकडो वर्षापासूनची डसन डुक्कराची प्रथा आजही कायम
मुलगी रात्री घरातून बेपत्ता (Kidnapping of Minor Girls)
दुसऱ्या घटनेत ३३ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या मुलीला (वय १६) पहाटे दोन वाजताच्या दरम्यान राहत्या घरातून अज्ञात इसमाने पळवून नेल्याचे नमूद आहे. रात्री मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचा प्रकार पहाटे दोन वाजता लक्ष्यात आल्यानंतर फिर्यादीसह नातेवाईकांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून मुलीचा शोध सुरू केला आहे.



