Kiran Lahamte : आमदार लहामटेंवर हल्लाबोल करत पवारांचे भांगरे यांना पाठबळ

Kiran Lahamte : आमदार लहामटेंवर हल्लाबोल करत पवारांचे भांगरे यांना पाठबळ

0
Kiran Lahamte : आमदार लहामटेंवर हल्लाबोल करत पवारांचे भांगरे यांना पाठबळ
Kiran Lahamte : आमदार लहामटेंवर हल्लाबोल करत पवारांचे भांगरे यांना पाठबळ

Kiran Lahamte : अकोले : पाच वर्षांपूर्वी एका डॉक्टरला संधी दिली, निवडून आणलं. मला वाटलं साधा माणूस आहे, शब्दाला किंमत देईन, लोकांना साथ देईल. अकोल्यातच भाषण केलं, शरद पवारांचे साथ सोडणार नाही. मुंबईत गेला आणि भलत्या सोबतच जाऊन बसला. कुठे जाऊन बसायचं हेच जर यांना कळत नसतं तर त्यांना येणाऱ्या विधानसभेत (Assembly) योग्य ठिकाणी नेऊन बसवायचं, अशा शब्दात शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवारांचे (Ajit Pawar) शिलेदार किरण लहामटे (Kiran Lahamte) यांच्यावर हल्लाबोल केला. अमितला तुम्ही पाठबळ द्या, असे आवाहन देखील यावेळी पवार यांनी अकोलेकरांना केले.

नक्की वाचा : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यतामध्ये खासदार लंके पुन्हा अव्वल

संगमनेर ते अकोले रॅलीचे आयोजन (Kiran Lahamte)

स्वर्गीय अशोक भांगरे यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे अकोले येथे आले होते. यावेळी संगमनेर ते अकोले रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच शरद पवारही अकोल्यात येणार असल्याने या कार्यक्रमाला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते. दरम्यान आपल्या भाषणातून शरद पवार यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भांगरे यांना पाठबळ देत अजित पवार गटात असलेले आमदार लहामटे यांच्यावर टीकेची झोड उठवली.

अवश्य वाचा: कोतूळ येथील धरणे आंदोलन तेराव्या दिवशीही सुरूच

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, (Kiran Lahamte)

आज शेतमालाला भाव नाही, बळीराजा संकटात आहे. किमान शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघेल, एवढे तरी भाव मिळावा, अशी अपेक्षा आहे. कांदा उत्पादक अडचणीत आहे. मात्र, त्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची नाही. आजपासून बरोबर 70 दिवसांनी विधानसभेच्या निवडणुका आहेत. तुमची एकही मजबूत असेल तर कोणी तुम्हाला धक्का लावू शकत नाही. हे राज्य तुमच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही. आजवर मला 56 वेळा लोकांनी निवडून दिले. आता काही मागायचं नाही आता एकच मागणं आहे, ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाची सत्ता आली पाहिजे. कष्टकरी, शेतकरी महिला भगिनी यांच्या हिताची चिंता करणारे सरकार राज्यात सत्तेत आलं पाहिजे, असे आवाहन यावेळी शरद पवारांनी उपस्थितांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here